रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकांमध्ये अध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलेसाठी राखीव आहे आणि जिल्ह्यातील आठ गट नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव आहे. त्यामुळे या आठ गटांमधूनच जिल्हा परिषदेचा नवा अध्यक्ष मिळणार आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण ५६ जागांसाठी सोमवार १३ रोजी आरक्षण प्रक्रिया राबविण्यात आली. त्यात २८ गट महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले असून, निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी २७ टक्क्यांप्रमाणे १५ जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.
सर्वसाधारण प्रवर्गासाठी २०, सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी १८, ओबीसी प्रवर्गासाठी ७, ओबीसी प्रवर्ग महिला ८, अनुसूचित जाती १, अनुसूचित जाती महिला १, अनुसूचित जमाती महिला १ यानुसार जागा आरक्षित, राखीव करण्यात आल्या आहेत.
ही सोडत श्रेयांश कुर्णे या विद्यार्थ्याच्या हस्ते काढण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी मनुज जिंदल, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, अपर तहसीलदार सचिन गोसावी उपस्थित होते. त्याचबरोबर उद्धवसेनेचे नूतन जिल्हाध्यक्ष विक्रांत जाधव, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख विलास चाळके, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संतोष थेराडे, माजी सभापती प्रकाश रसाळ, तालुकाप्रमुख शेखर घोसाळे तसेच राजकीय पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
————
मंडणगडमधील दोन्ही गट सर्वसाधारण
जिल्हा परिषद गटांचे आरक्षण पडल्यानंतर अनेकांचे पत्ते कट झाले आहेत. त्यामुळे इच्छुकांमध्ये कही खुशी, कही गम अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मंडणगड तालुक्यातील भिंगळोली, बाणकोट हे दोन्ही गट सर्वसाधारणसाठी खुले राहिले आहेत.
……………
असं आहे आरक्षण?
सर्वसाधारण गट : केळशी, कोतवडे, उमरोली, खालगाव, जालगाव, बाणकोट, कोळबांद्रे, भिंगरोळी, कोसुंब, कडवई, गोळप, धामापूर-तर्फे-संगमेश्वर, वडदहसोळ, धोपेश्वर, दयाळ, कोकरे, असगोली, दाभोळे, गवाणे, पावस.
सर्वसाधारण महिला : कळवंडे, पेढे, धामणदेवी, साटवली, खेडशी, आसगे, वहाळ, खेर्डी, कसबा संगमेश्वर, भांबेड, मुचरी साखरीनाटे, कातळी, साडवली, सावर्डे, झाडगाव (म्यु. बाहेर), वेळणेश्वर.
नागरिकांचा मागास प्रवर्ग : जुवाटी, कर्ला, पडवे, भडगाव, शृंगारतळी, सुकिवली, नाचणे.
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला : लोटे, कोंडकारुळ, भरणे, दाभोळ, शिरगाव, अलोरे, विराची वाडी, पालगड.
अनुसूचित जाती : हातखंबा
अनुसूचित जाती महिला : वाटद
अनुसूचित जमाती महिला : हर्णै



