Monday, March 23, 2026

Latest Posts

उपनगराध्यक्षपदी भाजपाचे समीर तिवरेकर यांची निवड

स्वीकृत नगरसेवकपदी बंड्या साळवी, अभि दुडये, संदीप उर्फ बाबू सुर्वे यांची निवड

रत्नागिरी: रत्नागिरी नगरपरिषदेच्या रिक्त असलेल्या उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक पदासाठीची निवडणूक प्रक्रिया आज पार पडली. यामध्ये राजकीय सत्तासमीकरणांचे दर्शन घडवत सर्व निवडी बिनविरोध पार पडल्या. उपनगराध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे समीर तिवरेकर यांची वर्णी लागली आहे, तर स्वीकृत नगरसेवक म्हणून शिवसेना आणि भाजपच्या दिग्गज नेत्यांची निवड करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून रिक्त असलेल्या उपनगराध्यक्ष पदासाठी समीर तिवरेकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध झाल्याची घोषणा करण्यात आली. तिवरेकर यांच्या निवडीनंतर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. शहराच्या विकासकामांना गती देण्यासाठी आणि प्रशासकीय कामकाजात समन्वय राखण्यासाठी तिवरेकर यांचा अनुभव मोलाचा ठरणार आहे.

नगरपरिषदेतील स्वीकृत नगरसेवक पदासाठी देखील एकमत पाहायला मिळाले. यामध्ये प्रदीप उर्फ बंड्या साळवी (शिवसेना): माजी नगराध्यक्ष म्हणून असलेला दांडगा अनुभव लक्षात घेऊन शिवसेनेने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

• अभि दुडये (शिवसेना): शिवसेनेचे सक्रिय पदाधिकारी म्हणून त्यांनी या पदावर वर्णी लावली आहे.

• संदीप उर्फ बाबू सुर्वे (भाजप): भाजपच्या वतीने बाबू सुर्वे यांची स्वीकृत नगरसेवकपदी एकमताने निवड करण्यात आली.

निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी नवनियुक्त उपनगराध्यक्ष आणि तिन्ही स्वीकृत नगरसेवकांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.