Sunday, March 22, 2026

Latest Posts

उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर यांची लांजा पोलिस ठाण्याला भेट

लांजा: उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर यांनी लांजा पोलीस ठाणेला नुकतीच भेट दिली. या भेटीत त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन प्रतिसाद’ अंतर्गत जागृती करण्यासाठी तालुक्यातील पोलीस पाटीलांना माहिती दिली.
या उपक्रमाच्या अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत थेट पोलीस प्रशासनाशी संपर्क करता यावा, यासाठी विशेष मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हे मोबाईल क्रमांक पोलीस पाटील आणि उपस्थित नागरिकांना देण्यात आले असून, त्यांचा प्रचार व प्रसार करून ते सर्व ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या सूचना निलेश माईनकर यांनी यावेळी दिल्या.
या प्रसंगी लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या तालुक्यातील पोलीस पाटील व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.