Tuesday, March 24, 2026

Latest Posts

कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनचा विजेते अभिषेक देवकाते, साक्षी जड्याळ

*तिसऱ्या पर्वाची संकल्पना एक धाव मराठी भाषेसाठी
*मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केले उद्घाटन
*३०० शहरांमधून राज्यांतून २२०० धावकांचा सहभाग
*रत्नागिरी झाली धावनगरी, पुढील वर्षी ३ जानेवारीला चौथे पर्व

रत्नागिरी: सुवर्णसूर्य फाउंडेशन आयोजित कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनच्या तिसऱ्या पर्वाचा विजेता ठरला अभिषेक देवकाते. त्याने १ तास १० मिनीटे व ७ सेकंदात २१ किमीचे चढ-उतार, वळणांचे रस्ते असलेले आव्हानात्मक अंतर पार करून विक्रम केला. आधीच्या पर्वातील स्वतःचाच विक्रम त्याने मोडला. त्याच्यापाठोपाठ अमोल आमूने व गौरव काकडे यांनी द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. महिलांच्या गटात १ तास २३ मिनीटे व २२ सेकंदात साक्षी जड्याळ यांनी अव्वल स्थान पटकावले. तर श्रेया पाटील व ऐश्वर्या लोंढे यांना अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळाला.

गुलाबी थंडी, नागमोडी वळणांचे चढ-उतारांचे रस्ते, खाडी व समुद्रपरिसर, जैवविविधता, पक्ष्यांचा किलबिलाट आणि नयनरम्य निसर्गसौंदर्य पाहत, मार्गावरील पुलांवरून धावताना वेगळीच उर्जा घेऊन धावपटू एक धाव मराठी भाषेसाठी धावले. १३ राज्यांतील ३०० शहरांतून २२०० हून अधिक धावपटू सहभागी झाले आणि ही मॅरेथॉन यशस्वी झाली. निमित्त होते सुवर्णसूर्य फाउंडेशन आयोजित कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनचे. एक धाव मराठी भाषेसाठी, रत्नागिरी झाली धावनगरी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय, गणपती बाप्पा मोरया अशा घोषणा देत मॅरेथॉनला सुरवात झाली.

मंत्री सामंत यांचा वक्तशीरपणा
थिबा पॅलेस रोड येथे बरोब्बर सव्वासहा वाजता मंत्री उदय सामंत पोहोचले. कुठल्याही भाषेला समर्पित असलेली ही जगातली पहिलीच मॅरेथॉन होती आणि खर्या अर्थाने ती आगळीवेगळी ठरली. यापूर्वी मध्यरात्री सुरू होणाऱ्या पहिल्या गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉनच्या वेळेसही ते अचूक वेळेवर अचूक वेळेवर आले आणि त्यांनी सर्वांची मने जिंकली होती, असे यावेळी स्पोर्ट्स टुरिझमसाठी काम करणारी देशातील एक अग्रणी संस्था असा जिचा नामोल्लेख केला जातो त्या सुवर्णसूर्य फाउंडेशनचे संचालक प्रसाद देवस्थळी यांनी सांगितले.

मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झेंडा दाखवून २१ व १० किमी स्पर्धेला सुरवात झाली. तर नगराध्यक्ष सौ. शिल्पा सुर्वे यांच्या हस्ते ५ किमी स्पर्धेला झेंडा दाखवण्यात आला. याप्रसंगी प्रांताधिकारी जीवन देसाई, नगरपालिकेचे मुख्याधिकारी वैभव गारवे, पोलिस अधिकारी श्री. माईनकर, शहर पोलिस निरीक्षक विवेक पाटील, सुवर्णसूर्य फाउंडेशनचे संस्थापक प्रसाद देवस्थळी उपस्थित होते. याप्रसंगी मंत्री सामंत व मान्यवरांचे स्वागत सचिन नाचणकर यांनी सन्मानचिन्ह देऊन केले. अशा स्पर्धेकरिता मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी राजाश्रय दिल्याचे सांगून एमआयडीसी, राज्य मराठी संस्था, उदय सामंत फाउंडेशन यांचे भरीव सहकार्य लाभल्याचे देवस्थळी यांनी सांगितले. तसेच सर्व प्रसारमाध्यमे, प्रशासनाविषयी विशेष कृतज्ञता व्यक्त केली.

महत्त्वाचे धावपटू
गतीदूत- भूषण बांदेलकर , अनिरुद्ध क्षीरसागर, तुषार माळी, योगेश देशमुख, नियती ठक्कर, राधा बसणकर, सूर्यकांत पारधी, अर्चना पांचाळ. धावदूत- योगिता पाटील, डॉ. स्वप्नील दाभोळकर, जयंत शिवदे, सुरभी सावर्डेकर, संतोष कनोजिया, ओंकार कांबळी, सुरेश वेलणकर, अरविंद काटकर, विजय फिरके, संतोष शिंदे, सचिन अप्पा खरात, आशिष डवळू, योगेश खरपुडे, भारत डांगळे, मिलिंद खानविलकर, महेश गुंदेचा, अभिजित पड्याळ, सुहास राजिवले, सतीश ठोंबरे, व्हीलचेअरवरून सादिक नाकाडे. प्रेरणादूत- मंगेश प्रभुदेसाई, श्वेता पांडे, डॉ. प्रशांत मडव, माधव काळे, सिद्धार्थ बागव.

छत्रपती शिवाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई, संत तुकाराम, दानशूर भक्तीभूषण भागोजीशेठ कीर यांच्या वेशभूषेत धावपटूंनी स्पर्धा पूर्ण केली. त्यांच्या वेशामुळे सर्व धावपटूंनाही प्रेरणा, प्रोत्साहन मिळाले. भारताचा झेंडा घेऊन व संपूर्ण अंगावर मराठी भाषा आणि नारळ पोफळीच्या लोगो रंगभूषा ठाण्यातील विठ्ठल कांबळे यांनी केली. आयुषी आयुष प्रसाद यांनी बाळाला बाबागाडीमध्ये बसवून स्पर्धा पूर्ण केली. तर काहींनी पारंपरिक वेषात स्पर्धा पूर्ण केली. रत्नागिरीचे जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, उपजिल्हाधिकारी राहुल गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांच्यासमवेत डॉक्टर्स, अभियंते, समाजातील प्रतिष्ठीत मंडळींनी धाव पूर्ण केली. सर्व फलक मराठी भाषेत लिहिले होते. त्यामुळे इंग्रजी शब्दांना योग्य पर्यायी मराठी शब्द वापरल्याने मराठी भाषेसाठी ही मॅरेथॉन समर्पित असल्याचे दिसून आले. बॅंक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक नरेंद्र देवरे यांच्या नेतृत्वात बॅंकेतील १०८ कर्मचाऱ्यांनी या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला. भाट्ये येथे शिवरुद्रा ढोलपथकाने किनारा परिसर ढोल ताशांच्या गजरात दणाणून सोडला. आरोही फिजोओथेरपी व डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटीच्या मुलांनी फिजिओथेरपी लोकमान्य मल्टीस्पेशालिटी, जिल्हा रुग्णालयाच्या रुग्णवाहिका सेवा यांच्या वतीने धावपटूंना मदत करण्यात आली.

कोकण कोस्टल मॅरेथॉनचे हे तिसरे वर्ष नावीन्यपूर्ण आहे. जगात एखाद्या भाषेवर मॅरेथॉन होते, हे या स्पर्धेने दाखवून दिले आहे. मराठी भाषेसाठी धाव होते, हे जगातले पहिले उदाहरण आहे. सुवर्णसूर्य फाउंडेशन व सर्व आयोजकांना मनापासून धन्यवाद. जगभरातील मॅरेथॉनला इंग्रजी गाणी लावून सुरवात होते. परंतु येथे मातृभाषेतली गाणी लावून व पारंपरिक वेशभूषेत ही स्पर्धा होत आहे. मराठी भाषेच्या उद्धारासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल अभिनंदन.
– उदय सामंत, मराठी भाषा मंत्री.

स्पर्धेचा गटनिहाय सविस्तर निकाल असा
२१ किमी- ३६ ते ४५ वयोगट- पुरुष- सुनील शिवणे, पवन प्रजापती, मल्लिकार्जुन पारडे, महिला- योगिता पाटील, दिव्या जयराम, विद्या रवळे. ४६ ते ५५ वयोगट- महिला- अनिता पाटील, मानसी मराठे, शीतल बने, पुरुष- रवींद्र जगदाळे, अनंत तानकर, जयंत शिवदे. ५६ ते ६५ वयोगट- पुरुष- पांडुरंग पाटील, केशव मोटे, संजय पाटील. खुला गट- महिला- साक्षी जड्याळ, श्रेया पाटील, ऐश्वर्या लोंढे. पुरुष- अभिषेक देवकाते, अमोल आमूने, गौरव काकडे. २१ किमी ६६ वर्षावरील महिला- लता आलिमचंदानी. पुरुष- हेमंत भागवत, चंद्रकांत धुरी, प्रमोद शेट्ये. ५६ ते ६५ वयोगट महिला- क्रांती साळवी, मंगलादेवी गवई.
१० किमी : ३६ ते ४५ वयोगट- महिला- इंदुबाला एस. माधुरी शिवदे, मनस्वी गुडेकर, श्वेताकुमारी, पुरुषगट – रूपेश शेलार, दीपक वरपे, वसीम शेख, ४६ ते ५५ वयोगट- महिला डॉ. वैशाली गायकवाड, स्मिता अडसूळ, सुनिता अरगडे, पुरुषगट- विठ्ठल अरगडे, शिवाजी पाटील, आतिश खोत, ५६ ते ६५ वयोगट- महिला- संगीता उबाळे, सुभाषिनी श्रीकुमार, शिल्पा भन्साळी, पुरुषगट- सुनील हरिदास, अतुल बांदिवडेकर, लक्ष्मण यादव, ६६ वर्षावरील पुरुष- दयाकिशन यादव, बजरंग चव्हाण, पुरुषोत्तम गुप्ता, महिला- डॉ. प्रमिला पाटील, शुभांगी देवरुखकर. खुला गट- महिला रोहिणी पाटील, खुशी हसे, मेघा सातपुते, पुरुष- ओंकार बायकर, आदित्य धुळप, शिवम कोष्टी.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.