मुंबई: प्रवाशांच्या मागणीचा विचार करून कोकण रेल्वेने कोलाड ते नांदगाव रोड आणि वेर्णा दरम्यान सुरू केलेल्या रोल-ऑन/रोल-ऑफ (Ro-Ro) सेवेसाठी नोंदणी करण्याची अंतिम तारीख वाढवली आहे. आता इच्छुक ग्राहक २० ऑगस्ट २०२५ पर्यंत या सेवेसाठी नोंदणी करू शकणार आहेत.
यापूर्वी नोंदणीची अंतिम तारीख १८ ऑगस्ट २०२५ होती, मात्र अनेक ग्राहकांनी मुदत वाढवण्याची विनंती केली होती. या विनंत्यांचा मान राखून कोकण रेल्वेने ही मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला.या सेवेमुळे कोकण रेल्वे मार्गावरील प्रमुख ठिकाणी वाहनांची वाहतूक सुरक्षित आणि सोपी होणार आहे. यामुळे रस्त्यांवरील गर्दी कमी होईल आणि प्रवासाची सोय वाढेल. ही सेवा कोकण रेल्वेच्या ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनाचे उत्तम उदाहरण आहे.
या सेवेसाठीच्या अटी आणि शर्ती तसेच नोंदणी प्रक्रियेची सविस्तर माहिती कोकण रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट www.konkanrailway.com वर उपलब्ध आहे.
सुनील बी नारकर,
मुख्य जनसंपर्क अधिकारी



