Thursday, August 14, 2025

Latest Posts

गणेश गोसावी ठरला राधाकृष्ण “श्री” किताब विजेता.

रत्नागिरी : राधाकृष्ण वैश्य मंदिर संस्थेच्या १०० व्या वर्धापन दिनानिमित्त वैश्ययुवा, रत्नागिरी संस्थेच्या माध्यमातून राधाकृष्ण श्री २०२५ ही जिल्हास्तरीय स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत अनेक नामवंत स्पर्धक सहभागी झाले होते. अतिशय चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत गणेश गोसावी याने मानाचा “राधाकृष्ण श्री २०२५” चा किताब पटकावला. तर ज्ञानेश शिंदे बेस्ट पोझर आणि रोशन बामणे याला उगवता तारा म्हणून गौरवण्यात आले.राधाकृष्ण वैश्य मंदिर संस्थेच्या १०० व्या वर्धापन दिनानिमित्त वैश्ययुवा संस्थेच्या वतीने “राधाकृष्ण श्री २०२५” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. चार गटात ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे उद्घाटन श्री. बीपीनचंद्र गांधी, डॉ. निनाद लुब्री यांच्या हस्ते झाले. त्यावेळी राधाकृष्ण वैश्य मंदिर संस्थेचे उपाध्यक्ष विरेंद्र वणजू, रत्नागिरी खबरदारचे संपादन हेमंत वणजू, सौरभ मलुष्टे, राजेश रेडीज, योगेश मलुष्टे, मिलींद दळी, निलेश मलुष्टे, समीर गांधी, दिनेश जठार, गणेश भिंगार्डे, सदानंद जोशी, जीतेंद्र नाचणकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी रत्नागिरी जिल्हा सहकारी बोर्डाच्या अध्यक्षपदी हेमंत वणजू यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा बीपीनचंद्र गांधी यांनी सत्कार केला. तसेच आडिव-यातील महालक्ष्मी मंदिराच्या अध्यक्षपदी श्री. शेटये यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार विरेंद्र वणजू यांनी केला. तसेच रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सौरभमलुष्टे यांचा सत्कार डॉ. निनाद लुब्री यांनी केला.

चार गटात ही स्पर्धा खेळवण्यात आली.

पहिल्या गटात प्रथम क्रमांक प्रसन्न भरत घाणेकर, द्वीतीय क्रमांक ज्ञानेश साईराज शिंदे, तृतीय क्रमांक राजेंद्र किसन बंडबे, चौथा क्रमांक संतोष माधव पावसकर, पाचवा क्रमांक किरण नारायण जाधव

दुस-या गटात प्रथम क्रमांक सुयोग संतोष पदुमले, द्वीतीय क्रमांक राज रुपेश गावकर, तृतीय क्रमांक शुभम हरिश्चंद्र हुमणे, चौथा क्रमांक दिपक दत्ताराम विजीतकर, पाचवा क्रमांक संकेत सुधाकर साळवी

तिस-या गटात प्रथम क्रमांक गणेश संजय गोसावी, द्वीतीय क्रमांक संजय शिवाजी डेरवणकर, तृतीय क्रमांक अनिष सखाराम शेंडेकर, चौथा क्रमांक आर्यन दिनेश घाणेकर, पाचवा क्रमांक संदेश शिवाजी गवाणकर

चौथ्या गटात प्रथम क्रमांक ओमकार दिनेश सुर्वे, द्वीतीय क्रमांक अभिनंदन सुधीर सातोपे, तृतीय क्रमांक फैजान रहिम मुल्ला, चौथा क्रमांक अनुप प्रकाश पेडणेकर, पाचवा क्रमांक रोहन विद्याधर भालेकर

गणेश गोसावी हा स्पर्धेचा विजेता ठरला, स्पर्धेतील किताब विजेत्याला विरेंद्र वणजू यांच्या हस्ते मानाचा पट्टा प्रदान करण्यात आला. तसेच आकर्षक शिल्ड संस्थेचे कार्यकारी सदस्य सिध्दार्थ बेंडके व मिलींद दळी यांच्या हस्ते देण्यात आले. बक्षिस वितरण वेळी अजयशेठ गांधी, निलेश मलुष्टे, हर्षद रेडीज, ऋषी धुंदूर, सदानंद जोशी, नरेंद्र वणजू, सचिन केसरकर, मुकुल रेडीज, मनोर दळी, सुनिल बेंडखळे, समीर रेडीज, अजिंक्य धुंदूर, बाबा शेटये उपस्थित होते.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.