Thursday, March 13, 2025

Latest Posts

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात नविन कायदे व अंमलबजावणी कार्यशाळा; विद्यार्थी, नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद

रत्नागिरी : रत्नागिरी पोलीस दलाच्या वतीने गोगटे जोगळेकर महाविद्यालय येथे शुक्रवारी, दि. ७ फेब्रुवारी २९२५ रोजी ११ ते १२.४५ वेळेत नविन कायदे व अंमलबजावणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक निखील पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी माईनकर, शहर पोलीस निरीक्षक सतीश शिवरकर आदी उपस्थित होते.  या कार्यक्रमाला गोगटे महाविद्यालयाचे कार्याध्यक्ष श्रीमती शिल्पा पटवर्धन, मकरंद साखरकर (प्राध्यापक), चित्रा गोस्वामी, प्राध्यापक ॲड  सोनाली खेडेकर, ॲड. आशिष बर्वे,  सुनील गोसावी, (प्राध्यापक) गोगटे महाविद्यालय रत्नागिरी ज्युनिअर कॉलेज, कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.  या कार्यशाळेला मार्गदर्शन करताना मान्यवर मंडळींनी विविध कायद्यासंदर्भात माहिती दिली. यामध्ये पोस्को  कायदा, विशाखा समिती, निर्भया समिती, लहान मुला-मुलीचा लैगिंक छळ अशा अनेक क्रुत्याचे प्रकार सांगून कायद्यात झालेल्या अमुलाग्र बदल, बदललेल्या कायद्यांचा ऊद्देश व कायद्याचा धाक व नमुद केलेल्या शिक्षेबाबत माहीती दिली. 
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) या कायद्यातील तरतुदी, मोबाईलचा वापर, इलेक्ट्रॉनिक वस्तुचा वापर व त्यातून निर्माण होणारे दखल पात्र अपराध याबाबत सखोल विश्लेषण करून माहीती दिली. पाठलाग, ऑनलाईन पाठलाग, धार्मिक पोस्ट, धर्माचा अपमान करणारे ईमेज-मेसेज व्हीडीओ फॅारवर्ड करणे प्रसारीत करणे याचे देखील गांभीर्य समजावुन सांगितले.
ऑनलाईन फ्रॅाड, लिंकवर क्लीक, ओटीपी शेअर , आलेल्या मेसेजची/व्हीडीओची खात्री याबाबत जागृत राहणे आवश्यक आहे. बीएनएसएसमधील इलेक्ट्रॉनिक पुरावे त्याचे महत्व कायद्यात मान्यता व शिक्षा याबाबत सविस्तर माहीती दिली तसेच महाविद्यालयीन स्तरावर महिला कक्ष, तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात यावे याबाबत सूचना करण्यात आल्या. या कार्यशाळेला सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, सुमारे १०० ते १५० विद्यार्थी, नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.