चिपळूण: चिपळूण-संगमेश्वरचे आमदार, कार्यसम्राट शेखर निकम तसेच सह्याद्री शिक्षण संस्था, सावर्डे यांच्या अथक प्रयत्नातून खरवते कृषी महाविद्यालयाच्या परिसरात आधुनिक क्रीडांगणाची उभारणी सुरू होत आहे.या उपक्रमामुळे चिपळूण व संगमेश्वर तालुक्यातील नवतरुण खेळाडू यांना खेळातील प्राविण्य सिद्ध करण्यासाठी जागतिक दर्जाचे व्यासपीठ मिळणार आहे.
👉 *क्रीडांगणात उभारले जात आहे*
*अद्ययावत इंडोर स्टेडियम*
*आंतरराष्ट्रीय दर्जाचे ४ क्रिकेट विकेट्स व खेळाचे मैदान*
*आधुनिक बास्केटबॉल कोर्ट*
*सुव्यवस्थित व्हॉलीबॉल मैदान*
*बंदिस्त कबड्डी मैदान*
*सेमी ऑलिंपिक साईजचा जलतरण तलाव*
या सर्व सुविधा लवकरच उपलब्ध होत असून ग्रामीण भागातील तरुणाईला खेळाच्या क्षेत्रात नवे बळ, नवी संधी आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची संधी मिळणार आहे.
*सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार शेखर निकम यांच्या पुढाकारामुळे खरवते गाव क्रीडाक्षेत्रातील नवा प्रेरणादायी केंद्रबिंदू ठरणार आहे.*



