रत्नागिरी : दरवर्षी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येते. त्याप्रमाणे यावर्षीही रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांचे वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन दिनांक १४, १५ व १६ फेब्रुवारी २०२५ असे तीन दिवस करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेच्या २९ व्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन व जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी तसेच पंचायत समिती अधिकारी व कर्मचारी यांचेसाठी आयोजित केलेल्या विविध स्पर्धांच्या बक्षिस वितरणाचा मुख्य कार्यक्रम शुक्रवार, दिनांक १४/०२/२०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता मा. ना. डॉ. उदय सामंत, मंत्री, उद्योग व मराठी भाषा, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, रत्नागिरी जिल्हा यांच्या शुभहस्ते व मा. ना. योगेशजी कदम, राज्यमंत्री, गृह (शहरे), महसूल, ग्राम विकास आणि पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, मा. नारायण राणे, लोकसभा सदस्य, सुनिल तटकरे, लोकसभा सदस्य, भास्कर जाधव, विधानसभा सदस्य, शेखर निकम, विधानसभा सदस्य, किरणजी (भैया) सामंत, विधानसभा सदस्य, मा. श्री. एम्. देवेंदर सिंह (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी, रत्नागिरी, मा. श्री. किर्ती किरण पुजार (भा.प्र.से.), प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी व मा. श्री. धनंजय कुलकर्णी (भा.पो.से.), पोलीस अधिक्षक, रत्नागिरी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे.
शुक्रवार, दि. १४/०२/२०२५ रोजी सकाळी ठिक १०.३० वाजता पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून दुपारी ११.३० ते १.३० या वेळेत जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी तसेच पंचायत समिती अधिकारी व कर्मचारी यांचेसाठी आयोजित केलेल्या विविध स्पर्धांच्या बक्षिस वितरणाच्या मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ७.०० ते १०.०० या वेळेत जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचारी तसेच पंचायत समिती अधिकारी, कर्मचारी यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार, दि. १५/०२/२०२५ रोजी सकाळी ९.०० वा. सत्यनारायण महापूजा, सकाळी १०.३० वा. आरती व भजन तसेच सकाळी ११.०० ते १.०० या वेळेत जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी बंधू भगिनी यांचेसाठी फनीगेम्स व दुपारी १.३० वा. जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी बंधू भगिनी यांचेसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ७.०० ते १०.०० या वेळेत जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी बंधू भगिनी यांचा मराठी व हिंदी गाण्यांचा सदाबहार वाद्यवृंद (ऑर्केस्ट्रा) चे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार दि. १६/०२/२०२५ रोजी सकाळी ११.०० ते १.०० या वेळेत जिल्हा परिषद रत्नागिरी चे माजी पदाधिकारी, माजी जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा परिषद रत्नागिरी मुख्यालय मधून सेवानिवृत्त झालेले अधिकारी/कर्मचारी यांच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ७.०० ते १०.०० या वेळेत जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचारी तसेच पंचायत समिती अधिकारी, कर्मचारी यांचे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी जिल्हा परिषद रत्नागिरी च्या २८ व्या वार्षिक स्नहसंमेलनानिमित्त दि. १४,१५ व १६ फेब्रुवारी २०२५ असे तीन दिवस आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांचा सर्वांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद रत्नागिरीचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. किर्ती किरण पुजार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. परिक्षित यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी(साप्र) व प्रभारी प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, रत्नागिरी श्री. विजयसिंह जाधव, रत्नागिरी जिल्हा परिषद कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष श्री. दिनेश सिनकर व मंडळाचे सचिव श्री. किरण वाडेकर यांनी केले आहे.