Friday, March 20, 2026

Latest Posts

जिल्ह्यातील पहिल्या स्त्रीरोग तज्ञ डाॅ. सुनीता चव्हाण यांचे निधन

रत्नागिरी : येथील स्वस्तिक हॉस्पिटल व चिरायु हॉस्पिटलच्या संस्थापिका आणि जिल्ह्यातील पहिल्या स्त्रीरोग तज्ञ डाॅ. सौ. सुनीता रमेश चव्हाण (८६ वर्ष) यांचे आज पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले.  त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांचे राहते घरी स्वस्तिक बंगला, माळनाका येथे दुपारी २ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत ठेवण्यात येणार आहे. त्यांची अंत्ययात्रा स्वस्तिक बंगला माळनाका ते चर्मालय स्मशानभूमी अशी सायंकाळी ४ वाजता राहत्या घरातून निघणार आहे. त्यांच्या पश्चात पती डॉ. रमेश चव्हाण, मुलगा डॉ. नितीन चव्हाण, मुलगी डॉ. पल्लवी यादव, जावई, सून नातवंडे असा परिवार आहे.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.