Monday, March 23, 2026

Latest Posts

ठाकरे शिवसेनेकडून पहिला उमेदवारी अर्ज दाखल

रत्नागिरी : नगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून प्रसाद सुरेश सावंत यांच्या रूपात पहिला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.
नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज करण्यासाठी १७ नोव्हेंबर ही अंतिम मुदत असून, रविवारीही उमेदवारांना ऑनलाईन, ऑफलाईन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सोय राज्य निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे आजही उमेदवारांना आपले अर्ज दुपारी ३ वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करता येणार आहेत.
रत्नागिरी शहर प्रभाग क्रमांक ३ ‘ब’ मधून प्रसाद सावंत यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून, यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना उपनेते सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने, शहर प्रमुख प्रशांत साळुंखे उपस्थित होते.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.