रत्नागिरी: आमच्या ह्यांची बायपास झालेली. त्या गडबडीत डोळ्यांकडे लक्ष नाही राहिलं आणि मोतीबिंदू पिकला. मग काय, आमच्या ह्यांचं मोतीबिंदू ऑपरेशन करायला सांगितलं डॉक्टरांनी. पस्तीस ते चाळीस हजार खर्च सांगितला. आम्ही रिटायर माणसं. आता परत एवढे पैसे कुठून आणायचे? पण त्या कठीण परिस्थितीत पूजाच्या रूपाने स्वामीच धावले आमच्यासाठी. ती म्हणाली, आपण इन्फिगोमध्ये ऑपरेशन करूया. आमच्या बिल्डिंग मधल्या एकांनी देखील पूजाला सांगून त्यांच्या मोफत मोतिबिंदू ऑपरेशन कार्यक्रमांतर्गत स्वतःचं ऑपरेशन करून घेतलं. पूजा खूप हेल्पफूल आहे. तिचे उपकारच झाले आमच्यावर!
पूजा प्रसादे
मोतिबिंदू ऑपरेशन लाभार्थी
अबकी बार, पूजा ताई पवार!



