Wednesday, March 25, 2026

Latest Posts

नगरपरिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक मतदानासाठी सार्वजनिक सुटी

रत्नागिरी, दि. 28 : (जिमाका)- जिल्ह्यातील रत्नागिरी, चिपळूण, खेड व राजापूर या नगरपरिषद क्षेत्रात आणि देवरुख, लांजा, गुहागर या नगरपंचायत क्षेत्रात निवडणूकीसाठी  मंगळवार 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या दिवशी मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी क्रमांक सार्वसु-1125/प्र.क्र. 229/ जपकु (29) परक्राम्य संलेख अधिनियम 1881 (1881 चा 26) च्या कलम 25 मध्ये दर्शविलेल्या व भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची अधिसूचना क्रमांक 39/1/68 जेयुडीएल-तीन दि. 8 मे 1968 अन्वये शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन उपसचिव हेमंत महाजन यांनी   २ डिसेंबर २०२५ रोजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.*
        सदर मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या त्या मतदार संघांच्या बाहेर असतील त्यांना आणि केंद्र शासनाच्या शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम बँका इत्यादींनाही मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुटी लागू राहील.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.