Wednesday, March 25, 2026

Latest Posts

नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे उद्या स्वीकारणार पदभार

रत्नागिरी : मी रत्नागिरी शहराची प्रथम नागरिक, सौ. शिल्पा प्रशांत सुर्वे! माझ्या नावापुढे नगराध्यक्ष ही अत्यंत मानाची उपाधी लागण्यासाठी आपणा सर्व रत्नागिरीकर नागरिकांच्या शुभेच्छा, आशीर्वाद, अनेकांनी केलेली जीवापाड मदत, मेहनत आणि तुम्ही भरभरून केलेलं मतदान कारणीभूत आहे. माझं नगराध्यक्षपदी विराजमान असणं हा माझ्यासह रत्नागिरीकर नागरिकांचा सन्मान आहे असं मी समजते. आणि म्हणूनच, माझ्या विजयाचे शिल्पकार म्हणून मला आशीर्वाद देण्यासाठी उद्या सोमवार दिनांक २९ डिसेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता माझ्या पदग्रहण समारंभाला आपण सर्व रत्नागिरीकर नागरिकांनी मित्रमैत्रिणींसह आवर्जून उपस्थित रहावं यासाठी हे अगत्याचं निमंत्रण!
आपली विनीत,
सौ. शिल्पा प्रशांत सुर्वे
नगराध्यक्ष, रत्नागिरी नगर परिषद

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.