राजापूर : ओणीची (ता. राजापूर) कन्या असलेली परी संजय जड्यार हिने नुकत्याच चिपळूण येथे पार पडलेल्या २५ व्या जिल्हा अजिंक्यपद तायक्वांदो स्पर्धेत रौप्यपदक पटकावले.
परी जड्यार हिने लांजा तालुका तायक्वांदो फिटनेस अकॅडमीचे प्रतिनिधीत्व केले. तिने मिळवलेल्या या यशाबद्दल तिचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजापूर तालुका सचिव संजय विष्णू जड्यार (गोरुळेवाडी) यांची ओणी ह्याची ती मुलगी आहे.
परीने मिळवलेल्या यशात तिच्या गुरू राष्ट्रीय पंच आणि प्रशिक्षक तेजस्विनी आचरेकर, तेजस पावसकर, गौरव खेडेकर, शीतल आचरेकर, आई पायल जड्यार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.



