Saturday, March 15, 2025

Latest Posts

पाडावेवाडी येथील तालुकास्तरीय नाट्य स्पर्धेत ‘ कडीपत्ता ‘ ठरले प्रथम क्रमांकाचे मानकरी

रत्नागिरी : शहरानजिकच्या मिरजोळे येथील श्री माघी गणेशोत्सव मंडळ, पाडावेवाडी आयोजित तालुकास्तरीय दोन अंकी नाटय़स्पर्धेत कोतवडे पंचक्रोशी माजी विद्यार्थी संघाने सादर केलेल्या ‘कडीपत्ता’ नाटकांने प्रथम क्रमांकाचा मान पटकावताना वैयक्तिक सहा पारितोषिकेही प्राप्त केली. तर या स्पर्धेत ‘मी तर बुवा अर्धा शहाणा’ (नूतन बालमित्र बोरकर संगीत नाटय़ मंडळ, वरवडे) या नाटकाने द्वितीय आणि ‘गंध निशिगंधाचा’ (जुगाईदेवी आणि सुयोग कलामंच गावडेआंबेरे) यांना उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त झाला. 
  मिरजोळे पाडावेवाडी येथील रंगमंचावर ही तालुकास्तरीय नाटय़ स्पर्धा पार पडली. एकाहून एक सरस आणि दर्जेदार नाटकां सहभाग आणि त्यातील बहारदार अभिनयाने रसिकवर्गाला सांस्कृतिक मेजवानी लाभली. या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा रविवारी रात्रौ पार पडला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मिरजोळे येथील युवा व सामाजिक कार्यकर्ते वैभव पाटील, माजी सरपंच गजानन गुरव, माजी उपसरपंच राहुल पवार, ग्रा.पं.सदस्य विनायक गावकर, सौ. पूनम पाडावे, रंगकर्मी मनोहर वाडकर, पाडावेवाडी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष दिलीप पाडावे, उपाध्यक्ष सुनाद पाडावे, माजी ग्रा.पं.सदस्य भिकाजी पाडावे, वाडीतील ज्येष्ठ काशिनाथ पाडावे, प्रकाश पाडावे, सुनील कोलगे, प्रभाकर कोलगे, नागेश पाडावे यांची प्रमुख उपस्थिती होती. या स्पर्धेचे परिक्षक म्हणून ज्येष्ठ रंगकर्मी श्रीकांत पाटील आणि विनय घोसाळकर यांनी काम पाहिले. 
   या स्पर्धेत मी तर बुवा अर्धा शहाणा (नूतन बालमित्र बोरकर संगीत नाटय़ मंडळ, वरवडे), ‘चांदणी’ (कलारंग, रत्नागिरी), ‘गंध निशिगंधाचा’ (जुगाईदेवी आणि सुयोग कलामंच गावडेआंबेर) यांनी सादर केले. तर ‘कडीपत्ता’ (कोतवडे पंचक्रोशी माजी विद्यार्थी संघ, कोतवडे), ‘इश्काची इंगळी डसली’ (संकल्प कलामंच, रत्नागिरी), नाती गोती (श्री सिद्धीविनायक कलामंच, रत्नागिरी) या नाटकांचे सादरीकरण झाले होते.
    स्पर्धा अंतिम निकालामध्ये प्रथम क्रमांक – कडीपत्ता या नाटकांने पटकावल्याबद्दल कै. सुभाष हरी पाडावे यांच्या स्मरणार्थ सुजन आणि सुरज पाडावे यांच्या सौजन्याने आकर्षक चषक तसेच मंडळाच्यावतीने प्रमाणपत्र, पारितोषिक प्रदान करण्यात आल. द्वितीय क्रमांक- मी तर बुवा अर्धा शहाणा यांना कै. वसंत गणपत पाडावे यांच्या स्मरणार्थ अंकुश वसंत पाडावे यांच्याकडून चषक, मंडळाच्यावतीने प्रमाणपत्र, रोख पारितोषिक, आणि उत्तेजनार्थ – ‘गंध निशिगंधाचा’ यांना कै. वनिता आणि कै. चंद्रकांत अनंत चव्हाण यांया स्मरणार्थ प्रविण चव्हाण यांच्याकडून चषक तसेच मंडळायावतीने रोख पारितोषिक, प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. 
   तर या स्पर्धेत वैयक्तिक पारितोषिके पुढीलप्रमाणेः उत्कृष्ट दिग्दर्शन-प्रथम क्रमांक प्रसाद धोपट (कडीपत्ता), द्वितीय- दशरथ कीर (मी तर बुवा अर्धा शहाणा), उत्तेजनार्थ- अजित पाटील (गंध निशिगंधां) यांनी पटकावला.    उत्कृष्ट नेपथ्य- प्रथम क्रमांक प्रदीप पाटील (कडीपत्ता), द्वितीय- प्रविण बापर्डेकर, विजय मेस्त्री, रविंद्र तेरवणकर (नातीगोती), उत्तेजनार्थ-प्रदीप पाटील  (मी तर बुवा अर्धा शहाणा) यांना देण्यात आला. उत्कृष्ट प्रकाश योजना-प्रथम क्रमांक आदित्य दरवेस (कडीपत्ता), द्वितीय- संजय तोडणकर (मी तर बुवा अर्धा शहाणा), तर उत्तेजनार्थ- यश सुर्वे (चांदणी) यांना देण्यात आला. उत्कृष्ट पार्श्वसंगीत- प्रथम क्रमांक योगेश मांडवकर (‘इश्काची इंगळी डसली), द्वितीय क्रमांक- रुपेश जगताप (कडीपत्ता), तर उत्तेजनार्थ- शाहबाज गोलंदाज (चांदणी) यांना देण्यात आला.
    उत्कृष्ट अभिनय (पुरुष)- प्रथम क्रमांक – प्रसाद धोपट (कडीपत्ता), द्वितीय-ओमकार बोरकर (मी तर बुवा अर्धा शहाणा), उत्तेजनार्थ – रामचंद्र आंबेरकर (गंध निशिगंधाचा). तर उत्कृष्ट अभिनय विशेष पुरस्कार- प्रदीप घवाळी (नातीगोती), प्रसाद सुर्वे (  इश्काची इंगळी डसली). उत्कृष्ट अभिनय (स्त्री)- प्रथम क्रमांक : अमिषा देसाई (कडीपत्ता), द्वितीय – शिवानी जोशी (गंध निशिगंधा), उत्तेजनार्थ – पुजा महाकाळ (मी तर बुवा अर्धा शहाणा) यांना देण्यात आला. या सर्व पारितोषिक प्राप्त नाटय़संस्था व कलाकारांना या कार्यक्रमातील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आकर्षक चषक, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख पारितोषेक देउन सन्मानित करण्यात आले. ही स्पर्धा श्री माघी गणेशोत्सव मंडळ पाडावेवाडी आणि व्यवस्थापक, श्री कालिकादेवी नाटय़कलामंच, मिरजोळे, पाडावेवाडी यांनी मोलाची मेहनत घेतली.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.