रत्नागिरी :रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे सोमवार, दि. 18 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या तालुका शालेय कुस्ती स्पर्धेत पाली येथील मराठा मंदिर न्यू इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ने घवघवीत यश संपादन केले.या स्पर्धेत पाली हायस्कूलने तब्बल 13 पदके पटकावली असून, यामध्ये 10 प्रथम क्रमांक, 2 द्वितीय क्रमांक आणि 1 तृतीय क्रमांक असा भव्य निकाल लागला आहे.
🟡 14 वर्षाआतील मुले
कुमार अथर्व गराटे (इ. 8 वी क) – 52 किलो वजनी गट – प्रथम क्रमांक 🥇 [जिल्हास्तरीय निवड]
कुमार वरद धाडवे (इ. 8 वी क) – 57 किलो वजनी गट – प्रथम क्रमांक 🥇 [जिल्हास्तरीय निवड]
कुमार दक्ष कांबळे (इ. 8 वी ड) – 48 किलो वजनी गट – द्वितीय क्रमांक 🥈
🟠 17 वर्षाआतील मुले
कुमार मंथन कोकरे (इ. 9 वी अ) – 65 किलो वजनी गट – प्रथम क्रमांक 🥇 [जिल्हास्तरीय निवड]
कुमार धीरज नागले (इ. 11 वी) – 71 किलो वजनी गट – प्रथम क्रमांक 🥇 [जिल्हास्तरीय निवड]
कुमार युवराज रसाळ (इ. 9 वी अ) – 80 किलो वजनी गट – प्रथम क्रमांक 🥇 [जिल्हास्तरीय निवड]
कुमार दुर्वांक नागले (इ. 11 वी विज्ञान) – 110 किलो वजनी गट – प्रथम क्रमांक 🥇 [जिल्हास्तरीय निवड]
कुमार प्रथम पोवार (इ. 9 वी अ) – 60 किलो वजनी गट – द्वितीय क्रमांक 🥈
कुमार प्रणव माईन (इ. 8 वी अ) – 45 किलो वजनी गट – तृतीय क्रमांक 🥉
🟤 19 वर्षाआतील मुले
कुमार वेदांत नागले (इ. 12 वी) – 61 किलो वजनी गट – प्रथम क्रमांक 🥇 [जिल्हास्तरीय निवड]
कुमार यश कोत्रे (इ. 11 वी) – 70 किलो वजनी गट – प्रथम क्रमांक 🥇 [जिल्हास्तरीय निवड]
कुमार गौरव नागले (इ. 11 वी) – 79 किलो वजनी गट – प्रथम क्रमांक 🥇 [जिल्हास्तरीय निवड]
कुमार सोहम सावंतदेसाई (इ. 12 वी विज्ञान) – 125 किलो वजनी गट – प्रथम क्रमांक 🥇 [जिल्हास्तरीय निवड]
🔹 या कामगिरीमुळे एकूण दहा खेळाडूंची निवड जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी झाली आहे.
पाली हायस्कूलचा हा यशस्वी वारसा कायम राहिला असून, संस्थेचा क्रीडा लौकिक आणखीनच उज्वल झाला आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे व प्रशिक्षकांचे हार्दिक अभिनंदन.



