रत्नागिरी : जोपर्यंत अगदीच गरज पडत नाही तोपर्यंत सामान्य माणूस एखादा उपचार, डॉक्टर, तपासणी काहीच करत नाही. आमचंही तसंच होतं. कित्येक दिवस वाटूनही आम्ही डोळे तपासायला गेलो नव्हतो. पण पूजा वहिनींच्या वाढदिवसाला त्यांनी मोफत नेत्र तपासणी शिबिर ठेवलं आणि बांध फुटावा तसे आम्ही सगळे धावलो. ३५० लोकांनी मोफत नेत्र तपासणी करून घेतली. त्यातल्या १४५ जणांना वहिनींनी मोफत चष्मे दिले. ८ ते १० जणांची ऑपरेशन्स पण करुन दिली. आम्ही सगळ्यांनी वहिनींना खूप आशीर्वाद दिले. वाढदिवसानिमित्त कार्यक्रम, पार्ट्या सगळेच करतात. वहिनींनी आम्हांला दृष्टीदान केलं असं म्हणावं लागेल.
*सुनील शिवलकर*
*चष्मेवाटप लाभार्थी*
अब की बार, पूजाताई पवार!



