Wednesday, March 25, 2026

Latest Posts

फोटो जर्नलिझम साठी नवनवीन विषयांवर अभ्यास करणे गरजेचे: देवदत्त कशाळीकर

रत्नागिरी : वेगवेगळ्या प्रोजेक्टवर काम केले तर स्टोरीज मिळत जातात. जर्नालिझम फोटोग्राफी ही ओव्हर ऑल जगातली तीन नंबरची फोटोग्राफी आहे जिथे फोटोग्राफर स्वतःला सिद्ध करू शकतो. एक नंबरला येते ती स्ट्रीट फोटोग्राफी, त्यानंतर दोन नंबरला ट्रॅव्हल फोटोग्राफी आणि मग नंबर लागतो तो फोटो जर्नालिझमचा. फोटो जर्नालिझममधून काम करणारा जो फोटोग्राफर असेल त्याला नवनवीन विषयांवर अभ्यास करून सखोल एक कंपाईल प्रोजेक्ट देणे ही आता काळाची गरज आहे, असे प्रतिपादन देवदत्त कशाळीकर यांनी केले. अधिक बोलताना ते म्हणाले, “फोटोग्राफी हा असा व्यवसाय आहे की ज्याने जग व्यापले आहे. म्हणजे आता असे कोणतेच क्षेत्र शिल्लक नाही ज्याला छायाचित्रणाची गरज नाही. सर्वसामान्यांपासून ते अति श्रीमंत असणाऱ्या सर्वांनाच प्रसिद्धीची गरज आहे, जाहिरातीची गरज आहे आणि त्याचवेळी जिथे जाहिरात आणि प्रसिद्धी हे शब्द येतात तिथे कंटेंट हा शब्द येतो आणि कंटेंट म्हटलं की फोटोग्राफी येते, व्हिडिओग्राफी येते आणि हे आता अपरिहार्य झालेले आहे.”
“एकेकाळी म्हणजे साधारण 30-35 वर्षांपूर्वी स्थिती होती की जी कालांतराने खूप जलद बदलली ती जेव्हा छायाचित्रकार म्हणजे म्हणजे केवळ लग्नातलेच फोटो काढणारा छायाचित्रकार असे होत होते. पण तंत्रज्ञान इतक्या जलदरीतीने विकसित होत गेले की मिररलेस कॅमेरे आले, फुल फ्रेम कॅमेरे आले, अनेक पद्धतींच्या लेंसेस आल्या, उपकरणे आली. आणि बऱ्याच वेळेला त्या पद्धतीने त्या फोटोग्राफरला त्या रेसमध्ये धावता आले नाही. कदाचित त्या रेसमध्ये तो मागे पडत गेला. त्याला अनेक कारणे होती. ती कारणे आपण जर समजून घेतली तर आता जे आता ज्या पद्धतीने फोटोग्राफरला काम करणे गरजेचे आहे त्या पद्धतीने उपाय योजना कोणत्या करता येतील याकडे पाहिले पाहिजे.” ते पुढे म्हणाले, “एका फोटोमधून सांगायचे जे दिवस होते ते तेव्हाही होते आणि आजही आहेत. पण प्रत्येक वेळेलाच फेवरेबल सिच्युएशन असेल असे नाही या सगळ्यांमधून काम करताना आता मोबाईलने सुद्धा उत्तम काम करता येते. हाय एंड कॅमेरा असणार इयत्ता आवश्यक असणारी गोष्ट नाहीये. कॅमेरा नाही म्हणून मी वृत्तपत्र छायाचित्रकार होऊ शकणार नाही असे काही नाहीये. शेवटी काम हे मेंदू वरती केलं जातं कॅमेरा हे केवळ टूल आहे, असे मार्गदर्शन त्यांनी फोटो जर्नालिजममध्ये किंवा छायाचित्रण क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या छायाचित्रकारांना केले.

दरम्यान ही कार्यशाळा  रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर आणि व्हिडिओ ग्राफर यांनी यशस्वीरित्या पार पाडली. तसेच या कार्यशाळेला राज्याचे उद्योग मंत्री डॉ उदय सामंत आणि शिवसेना तालुकाप्रमुख तुषार साळवी यांनी देखील सहकार्य केले. या वर्कशॉप मध्ये किशन फोटो प्लाझा कोल्हापूर आणि SRK लॅब मुंबई यांचे तसेच रत्नागिरील तरुण उद्योजक गौरांग आगाशे या सर्वांचे विशेष सहकार्य लाभले.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.