Saturday, March 21, 2026

Latest Posts

भयानक संकट ! मुसळधार पाऊस अन् नदीपात्रात माणसं अडकली; रात्रीच्या अंधारात थरकाप उडवणारं रेस्क्यू ऑपरेशन

चिपळूण: कोकणात मान्सून दाखल झाल्यावर पहिल्या दिवशीच रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील खडपोली येथे चार इसम नदीपात्रामध्ये अडकल्याची धक्कादा घटना घडली होती. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. चिपळूण तालुक्यात रविवारी रात्री उशिरा ही घटना घडली. या सगळ्या घटनेची तातडीने दखल घेत चिपळूण तालुका प्रशासनाचे प्रमुख प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्या नेतृत्वाखाली चिपळूण तालुका प्रशासन रेस्क्यू टीमने हे बचावकार्य रात्री उशिरापर्यंत चार तासांच्या अथक प्रयत्न करून पूर्ण केल आहे. अडकलेल्या तीन नागरिकांमध्ये एक महिला लहान मुलगा व एक इसमाचा समावेश होता. हे सगळे नदीपात्रात मासेमारी करायला गेले होते अचानक पाणी वाढल्याने हे अडकले मात्र नदीपत्रात एक बेट असल्याने ते सुरक्षित उभे राहिले होते. अन्यथा मासेमारी करायला जाणे त्यांच्या जीवावरती बेतले असते. मात्र दैव बलवत्तर म्हणून हे तिघेही सुखरूप बचावले आहेत. चिपळूण रेस्क्यू टीम या चौघांसाठी देवदूत ठरली आहे. त्यामुळे मान्सूनच्या पहिल्याच दिवशी चिपळूण रेस्क्यू टीम ॲक्शन मोडवर होती.



अडकलेल्यांमध्ये संतोष वसंत पवार चाळीस वर्षे  राहणार दळवटणे त्याची पत्नी  सुरेखा  संतोष पवार 35 वर्ष त्याचा पुतण्या ओंकार रवी पवार  17 वर्ष राहणार दळवटणे राजवाडा यांचा समावेश होता. या सगळ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आल आहे.



चिपळूण नगरपालिका आणि अग्निशमक विभाग रेस्क्यू टीम घटनास्थळी रात्री नऊच्या दरम्यान दाखल झाली होती.आपत्तीव्यवस्थापन टीममधील  निखिल पवार, अजय कदम, आकाश कदम दाखल झाले आहेत. मौजे पिंपळी खुर्द सोनारवाडी येथील नदीपात्रात मासेमारी करिता गेलेले चार लोक अडकलेले होते याची माहिती तातडीने प्रशासनाला देण्यात आली. चिपळूणचे प्रांत अधिकारी आकाश लिगाडे यांना या घटनेची माहिती समजतात त्यांनी तातडीने पाणी थांबवण्याच्या सूचना दिल्या. कोळकेवाडी येथून  होणाऱ्या टप्पा एक व दोन बंद करून पाणी सोडण्याचे थांबवण्यात आल आहे
त्यामुळे आता पाणी कमी झाल्यावर त्याला सुरक्षित नदीपत्रातून बाहेर काढण्यासाठी रस्सी घेऊन रेस्क्यू टीम त्यांच्यापर्यंत पोहोचली तोवर त्यांना पाण्याजवळ न येता सुरक्षित रित्या बेटांवरतीच उभे रहा असा धिर देण्यात आला होता. पिंपळी येथील हे चौघेही जण अडकल्याने प्रचंड घाबरले होते त्यामुळे वैद्यकीय पथकही तैनात ठेवण्यात आलं होतं. सगळ्या रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. चिपळूण पोलीस,महसूल अग्निशमन दल नगरपरिषद यंत्रणा आदी घटनास्थळी होत्या. अडकलेल्या चौघांना बाहेर काढण्यासाठी चिपळूण येथील रेस्क्यू टीम शर्थीचे  प्रयत्न केले. घटनास्थळी चिपळूणचे पीआय श्री.मेंगडे दाखल झाले होते.



रविवारी रात्री उशिरा मान्सून दाखल झाल्याच्या पहिल्याच दिवशी चिपळूण तालुका रेस्क्यू टीमचं टीमवर्क पाहायला मिळाल. चिपळूण तालुक्यातील पिंपळी येथील नदीमध्ये मासेमारी करण्यासाठी गेलेल्या एक अल्पवयीन मुलगा महिला व इसमाला तब्बल चार तासानंतर सुरक्षित बाहेर काढण्यात आले. महसूल, पोलीस, नगरपालिका, वैद्यकीय विभाग , महानिर्मिती व आपदा मित्र यांचे एकत्रित टीमवर्कचे चिपळूण तालुक्यातील नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे. चिपळूणचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेगडे यांचा ऑपरेशन झालं असतानाही ते बचाव कार्यात दाखल झाले होते. मान्सूनच्या पहिल्याच दिवशी रेस्क्यू टीम च्या कामाचा कस लागला होता.या सगळ्या प्रकारावर अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड व पोलीस चिपळूण येथील पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र राजमाने लक्ष ठेवून होते.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.