रत्नागिरी : राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे या आज (४ एप्रिल) रत्नागिरी दौऱ्यावर होत्या. या दौऱ्या दरम्यान त्यांनी रत्नादुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी उभारलेल्या शिवसृष्टीला दिलेल्या भेटीदरम्यान शहरातील मुरलीधर मंदिराजवळ असलेल्या कोकजे स्नॅक्स सेंटर मध्ये कॉफीचा आस्वाद घेतला.
मंत्री अदिती तटकरे यांनी आज रत्नागिरी दौरा करत रत्नागिरीत सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी केली. या दौऱ्याच्या वेळी आदिती तटकरे यांनी शहरातील कोकजे स्नॅक्स सेंटर येथे जाऊन कॉफीचा आस्वाद घेतला. यादरम्यान त्यांनी कोकजे स्नॅक्स सेंटरचे मालक महेश कोकजे आणि मंदार कोकजे यांच्याशी पर्यटनाशी संबंधित चर्चा केली. यामध्ये रत्नागिरीत सध्या पर्यटकांची संख्या कशी असून हॉटेल व्यवसाय कसा सुरू आहे याचीही माहिती घेतली.
यावेळी मंत्री अदिती तटकरे यांच्या समवेत तालुकाध्यक्ष आबूशेठ ठसाळे, दिशा दाभोलकर, तालुकाध्यक्ष बंटी वणजू उपस्थित होते.


