रत्नागिरी – दि .१५ ते १९ सप्टेंबरदरम्यान २० वा महाराष्ट्र पोलीस कर्तव्य मेळावा -२०२५ हा राज्य राखीव पोलीस बल गट-2, पुणे येथे पार पडला. या कर्तव्य मेळाव्यात “पोलीस फोटोग्राफी” या स्पर्धा प्रकारात महाराष्ट्र पोलीस दलातील एकूण ४४ पोलिस अंमलदारांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत कोकण परिक्षेत्र, व रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील पोलीस हवालदार अमोल अरुण गमरे, नेमणूक जिल्हा विशेष शाखा, रत्नागिरी यांनी “पोलीस फोटोग्राफी” या स्पर्धा प्रकारात सहभाग घेत कांस्य पदक व प्रमाणपत्र प्राप्त केले. त्याबाबत त्यांचे मा. विशेष पोलिस महानिरीक्षक कोंकण परिक्षेत्र श्री. संजय दराडे यांनी विशेष अभिनंदन केले असून आज दिनांक २२ रोजी पोलीस अधीक्षक रत्नागिरी नितीन बगाटे यांनी पोलिस हवालदार . अमोल गमरे यांना पुष्पगुच्छ देऊन गौरव केला. तसेच अपर पोलीस अधीक्षक रत्नागिरी बी.बी. महामुनी, पोलिस उपअधीक्षक (मुख्या.) राधिका फडके व पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा नितीन ढेरे यांनी देखील त्यांचे अभिनंदन केले आहे.



