Saturday, March 21, 2026

Latest Posts

महिला पोलिसांनी कार्यालयातच केले रक्षाबंधन साजरे

रत्नागिरी : भाऊ व बहिणीच्या अतूट नात्याचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधनाचा सण शनिवारी जिल्ह्यात सर्वत्र उत्साह साजरा करण्यात आला. सर्व वयोगटातील बहिणींनी आपल्या भावांचे औक्षण करून राखी बांधली. विशेषतः कायदा व सुव्यवस्थेसाठी कायम कार्यरत राहणाऱ्या महिला पोलिसांनी कार्यालयातच रक्षाबंधन साजरे केले. भाऊ कामानिमित्त बाहेर असल्यास त्याच्यासाठी बहिण राखी खरेदी करून ती पाठवून देते. त्यामुळे रक्षाबंधनापूर्वी आठवडाभर आधीच राख्यांची खरेदी करण्याची लगबग महिलांमध्ये सुरू होती. जिल्हा प्रशासनाने नारळी पौर्णिमेची स्थानिक सुट्टी जाहीर केली होती. शनिवारी शासकीय करांना सुट्टी होती मात्र बहुतांश शाळा महाविद्यालय सुरू होती. खासगी कार्यालयेही सुरू होती. बाल निरीक्षण गृहे पोलीस प्रशासन कार्यालयातून शाळकरी विद्यार्थ्यांनी रक्षाबंधन साजरे केले. २४ तास कार्यरत असणाऱ्या महिला पोलिसांनी मात्र कार्यालयात रक्षाबंधन केले. कार्यातील पुरुष कर्मचाऱ्यांच्या हातावर राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.

मर्यादित मुहूर्तामुळे अनेकांची घाई

दरवर्षी नारळी पौर्णिमा व राखी पौर्णिमा एकाच दिवशी असते. मात्र, यावर्षी दि. ८ रोजी नारळी पौर्णिमा तर दि. ९ रोजी राखी पौर्णिमा साजरी करण्यात आली. रक्षाबंधनासाठी सकाळी ५:४७ ते दुपारी १.२४ पर्यंत ७ तास ३७ मिनिटांचा वेळ सुभाष असं सांगण्यात आले होते. त्यामुळे सकाळचा 17 राखी बांधण्यासाठी घाई झाली होती.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.