Sunday, March 29, 2026

Latest Posts

मिरजोळे   वरचीवाडी  प्राथमिक  शाळेत बालकलाकारांचा रंगला दिमाखदार ‘कलावैभव’ सोहळा! 

रत्नागिरीः जि.प.वरीवाडी प्राथमिक शाळेत सांस्कृतिक गुणदर्शन सोहळय़ाप्रसंगी विद्यार्थ्यां सत्कार करताना पांयत समिती सदस्य वैभव पाटील, सोबत माजी सरपां गणेश पाडावे, दिनेश पाडावे, प्रितेश कांबळे, संतोष पाडावे आदी.



रत्नागिरी: रत्नागिरी शहरानजिकाया जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा मिरजोळे वरचीवाडी व अंगणवाडीतील चिमुकल्यांच्या सुप्त गुणांना वाव देणारा ‘विविध गुणदर्शन‘ सोहळा नुकता मोठय़ा उत्साहात संपन्न झाला. शालेय जीवनात अभ्यासासोबतच कलेचे महत्त्व अधोरेखित करणाऱया या कार्यक्रमात विद्यार्थ्यां उपस्थित मान्यवरांयाहस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात अतिशय मंगलमय वातावरणात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने करण्यात आली. यावेळी पांयत समिती सदस्य वैभव पाटील, मिरजोळे ग्रा.पं. माजी सरपां गणेश पाडावे, वरीवाडी प्रमुख दिनेश पाडावे,  संतोष पाडावे, दीपक गावकर व सौ. समीक्षा पाडावे यांसह गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या मनोगतातून शाळेच्या उपक्रमांचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या मध्यंतरात नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य वैभव पाटील यांचा शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. सोहळ्याच्या शेवटी शाळेचे मुख्याध्यापक सािान शिंदे यांनी उपस्थित सर्व मान्यवर, ग्रामस्थ आणि पालकांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील शिक्षिका सौ.मनाली पाटील तसेच अंगणवाडी बाई व मदतनीस आणि पालकांनी विशेष परिश्रम घेतले. 
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी सादर केलेले विविधरंगी सांस्कृतिक कार्यक्रम. रंगमंचावर अवतरलेल्या चिमुकल्यांनी ‘दीपनृत्य‘ आणि लयबद्ध ‘कोळीगीतांनी‘ उपस्थितांची मने जिंकली. केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘देशभक्तीपर गीते‘ आणि ‘पर्यावरण रक्षणाचे‘ संदेश देण्राया नाटुकल्यांतून सामाजिक भानही जपत सर्वांना अंतर्मुख केले. विशेषत ‘मराठी भाषा संवर्धन‘ आणि ‘मराठी शाळा टिकवण्यासाठी‘ सादर केलेल्या जनजागृतीपर गीताला प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. मूल्य शिक्षणावर आधारित नाटय़छटा आणि विनोदी प्रहसनांनी कार्यक्रमात अधिक रंगत भरली.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.