रत्नागिरी: श्री संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त येत्या बुधवारी (दि २० ऑगस्ट) नाभिक समाज हितवर्धक मंडळातर्फे (रत्नागिरी) येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवारी सकाळी ८ वाजल्यापासून विविध धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ होईल. यामध्ये पंचामृती, आरती होईल. त्यानंतर हळदीकुंकू, भजन होईल. सकाळी १० वाजता श्री संत सेना महाराजांच्या पालखीची मिरवणूक निघेल. दुपारी १२ वाजता नाभिक समाजबांधवांचा स्नेहमेळावा होईल. या वेळी गुणवंतांचा गौरव करण्यात येईल. दुपारी महाप्रसादानंतर भजन, सायंकाळी धूपारती होऊन कार्यक्रमाचा समारोप होईल. सर्व कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नाभिक समाज हितवर्धक मंडळातर्फे करण्यात आले आहे.



