Monday, March 23, 2026

Latest Posts

रत्नागिरी नगर पालिकेतील सफाई व इतर ५५ कर्मचारी कपातीसंदर्भात शिवसेना आक्रमक

रत्नागिरी : आर्थिक बाब पुढे करत रत्नागिरी नगर पालिकेने कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक सफाई व इतर ५५ कर्मचारी नुकतेच कमी केले. या पार्श्वभूमीवर आज शिवसैनिकांनी नगर पालिकेत जात पालिकेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांची भेट घेतली आणि लवकरात लवकर या विषयावर तोडगा निघावा, अशी भूमिका घेतली.

दहीहंडी व गणेश उत्सवाच्या तोंडावरती रत्नागिरी नगर पालिकेने कर्मचारी कपात केल्यामुळे कचरा गाड्या लोकांकडे उशिराने दुपारी जात आहेत. त्यामुळे नागरिकांचा अडचण निर्माण होत आहे. ठिकठिकाणी अतिवृष्टीमुळे झालेले खड्डे तात्काळ बुजवावेत अशी सूचना केल्या गेल्या. शिळ धरणावरील वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर एक्सप्रेस फिडरवरील वीजपुरवठा एमएसईबीच्या हलगर्जीपणामुळे वारंवार खंडित होतो तो खंडित न होता वीज पुरवठा सुरळीत झाला पाहिजे, जेणेकरून नागरिकांची पाण्याची गैरसोय होता कामा नये, ही बाब लक्षात येताच शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख राहुल पंडित व शहर प्रमुख बिपीन बंदरकर उपजिल्हाप्रमुख राजन शेटे, महिला शहर संघटक स्मितल पावसकर यांच्या नेतृत्वाखाली निमेश नायर, दीपक पवार, संजय हळदणकर, बंटी कीर, राकेश नागवेकर, अभिजीत दुडे, सौरभ मुलुष्टे, मनोज साळवी, मनीषा बामणे, हेमंत जाधव व इतर शिवसैनिक यांनी पालिकेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांची भेट घेतली आणि लवकरात लवकर या विषयावर तोडगा निघावा, अशी भूमिका घेतली.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.