राजापूर : राजापूर तालुक्यातील पेंडखळे भवानी मंदिर येथे विजेच्या खांबावर काम करत असताना विजेच्या तीव्र धक्क्याने तरुण वायरमन अनिकेत परवडी (राह. तिथवली, ता.राजापूर) याचा दुर्दैवी मृत्यू झाला. तो २७ वर्षांचा होता. मंगळवारी सायंकाळी उशिरा ही घटना घडली आहे.
ऑपरेटरकडून वीज वाहिनी बंद करून तो दुरुस्तीसाठी खांबावर चढला होता. मात्र विजेचा तीव्र धक्क्याने तो खाली पडला आणि त्याचा मृत्यू झाला. त्याचे पार्थिव सायंकाळी उशिरा येतील सरकारी रुग्णालयात आणण्यात आले.



