Monday, March 23, 2026

Latest Posts

राजापूर शहरात आजपासून ३ दिवस एस.टी. सेवा बंद

राजापूर: मुख्य रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पेवर ब्लॉक भरण्यासाठी रविवार, दि.१० ते मंगळवार, दि. १२ ऑगस्ट असे तीन दिवस शहरातील एस.टी. व अवजड वाहनांची वाहतूक बंद राहणार आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवरील कुशे मेडिकल दरम्यान पडलेल्या खड्ड्यांमुळे तेथे नगरपरिषदेने पेव्हर ब्लॉक बसवण्याचे काम हाती घेतले. त्याचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. आता उर्वरित टप्प्यात हनुमान गल्ली ते जव्हार चौकातील शिवस्मारक या भागात पेव्हर ब्लॉक बसवले जाणार आहेत. त्यामुळे रविवार, दि.१० ते मंगळवार, दि. १२ ऑगस्ट यादरम्यान या मार्गावर एस.टी. बस, अवजड वाहनांची वाहतूक बंद राहणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी केले आहे.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.