Sunday, June 8, 2025

Latest Posts

रिक्षेतून अवैद्य मद्य वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकाला स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक

रत्नागिरी: रत्नागिरी शहरातून एका इसमाकडून ८७,१२० किमतीचे मद्य व  १,५०,०००/- किमतीची ऑटो रिक्षा जप्त करण्यात आली असून ही कारवाई  स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली आहे. सोमवारी सायंकाळी गोपनीय  माहितीच्या आधारावर रत्नागिरी शहरातील परटवणे परिसरात एका रिक्षेतून अवैद्य मद्य वाहतूक करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे  अन्वेषण शाखेला मिळाली होती. त्याच्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे , अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. पोलीस हेडकॉन्स्टेबल शांताराम झोरे, बाळू पालकर, प्रवीण खांबे, गणेश सावंत,  वैष्णवी यादव, आणि पोलीस कॉन्स्टेबल अतुल कांबळे यांनी ही कारवाई केली आहे.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.