५ ते ८ मे दरम्यान बाळासाहेब ठाकरे ॲक्टिव्हिटी सेंटर येथे आयोजन
रत्नागिरी : नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समिती आणि नगरसेविका सौ. पूजा दीपक पवार यांच्या वतीने ५ ते १४ वयोगटातील मुलांसाठी उन्हाळी शिबिराचे (समर कॅम्प) आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर ५ ते ८ मे या कालावधीत सकाळी ८.३० ते ११ यावेळेत बाळासाहेब ठाकरे ॲक्टिव्हिटी सेंटर, साळवी स्टॉप येथे होणार आहे. हे या शिबिराचे तिसरे वर्ष आहे.
पालकमंत्री उदय सामंत आणि लांजा – राजापूरचे आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी नगरपालिका प्रभाग क्रमांक ५ च्या नगरसेविका आणि महिला व बाल कल्याण समितीच्या उपसभापती सौ. पूजा दीपक पवार यांच्या पुढाकाराने हे उन्हाळी शिबिर भरविण्यात येत आहे.
या शिबिरात खेळ, कला, साहस, नवे मित्र, आणि नवा अनुभव मुलांना घेता येणार आहेत. संपूर्ण शिबिरादरम्याने मुलांची दररोज नाष्टाची व्यवस्था करण्यात आली आहे. शिबिरात सहभागी होणाऱ्या मुलांसाठी चित्रकला, नृत्य, पपेट शो, संगीत, खेळ, क्राफ्ट आणि मजेशीर उपक्रम राबविले जाणार आहेत. या शिबिराच्या पहिल्या दिवशी म्हणजेच ५ मे रोजी श्लोक, प्रार्थना, बोधकथा, वारली पेंटिंग, एरोबिक्स, ऑबस्टॅकल कोर्स व फनी गेम्स घेतले जातील. ६ मे रोजी श्लोक, प्रार्थना, बोधकथा, स्टोन पेंटिंग, एरोबिक्स, पपेट शो अँड पक्षांचे आवाज, ७ मे रोजी श्लोक, प्रार्थना, बोधकथा, एरोबिक्स, वाळू शिल्प, ८ मे रोजी श्लोक, प्रार्थना, बोधकथा, प्रोजेक्ट मांडणी, एरोबिक्स, बक्षीस समारंभ असे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. तसेच शेवटच्या दिवशीचे विशेष आकर्षण असणार आहे लाईव्ह चॅट कॉर्नर.
अधिक माहितीसाठी सौ. पूजा पवार (92845 29827), सौ. काव्या कामतेकर (70200 37825), आणि सौ. अंजली सावंत (92269 33704) यांच्याही संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



