मंडणगड : मंडणगड तालुक्यातील उमरोली व देव्हारे पंचायत समिती गण आयोजित लाख मोलाच्या दहीहंडी सोहळ्यात राज्याचे गृहराज्यमंत्री श्री. योगेशदादा कदम यांची विशेष उपस्थिती. मुंबई-पुणे सारख्या महानगरांत जसा उत्साह दिसतो, तसाच उत्साह व आनंद कोकणातील दहीहंडी सोहळ्यातही पाहायला मिळाला. या सोहळ्यात तब्बल ४७ गोविंदा पथके सहभागी झाली होती. काही पथकांनी गृहराज्यमंत्री श्री. योगेशदादा कदम यांना सलामी देत दहीहंडीचा आनंद लुटला.
गोविंदांना संबोधित करताना गृहराज्यमंत्री श्री. योगेशदादा कदम म्हणाले “जशी गोविंदा पथके थरावर थर रचून दहीहंडी फोडतात, त्याचप्रमाणे आपण सर्वांनी मिळून विकासाचे थर रचत पुढे जाऊन विकासाची दहीहंडी फोडायची आहे.”
शेवटी त्यांनी सर्व गोविंदा पथकांचे तसेच आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.








