Tuesday, March 24, 2026

Latest Posts

वाटद एमआयडीसीचे भवितव्य उद्या ठरणार

रत्नागिरी: तालुक्यातील प्रस्तावित वाटद एमआयडीसी संदर्भातील हरकतीवरील सुनावणी काही दिवसांपूर्वीच येतील उपविभागीय अधिकारी कार्यालयात घेण्यात आली होती. त्यामुळे वाटद एमआयडीसी होण्याचा मार्ग मोकळा होईल, असे वाटत असतानाच वाटद एमआयडीसी विरोधी संघर्ष कृती समिती आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांच्या वतीने खंडाळा येथे शनिवारी (१९) सर्वोच्च न्यायालयाचे वकील आणि मानवाधिकार विश्लेषक ॲड. असीम सरोदे यांच्या उपस्थितीत जन आक्रोश सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे या सभेला नेमके काय होणार ही उत्सुकता वाढली आहे. वाटद एमआयडीसी आणि विनाशकारी प्रकल्पांविरोधात स्थानिक एकटवले आहेत या अनुषंगाने वैयक्तिक हरकतींवरील सुनावणी पूर्ण झाली असली तरी सामूहिक सुनावणी पुढे गेली आहे. ग्रामस्थांनी वाटद एमआयडीसीला पूर्वीपासून विरोध दर्शविला असून या अनुषंगाने वाटत एमआयडीसी विरोधी संघर्ष कृती समिती आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने शनिवारी सकाळी दहा वाजता खंडाळा येथील सर्व साक्षी श्रद्धा प्रतिष्ठान मध्ये जण आक्रोश सभा आयोजित करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे वकील आणि मानवाधिकार विश्लेषक ॲड असीम सरोदे हे या सभेचे प्रमुख वक्ते आहेत. या सभेच्या माध्यमातून एमआयडीसीची अधिसूचना कायमस्वरूपी रद्द करण्यात यावी ही प्रमुख मागणी केली जाणार आहे. या कायदेशीर लढ्यात ॲड असीम सरोदे मार्गदर्शन करणार असून सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी दाद मागण्यासाठी त्यांची मदत घेतली जाणार असल्याचे संघर्ष समितीकडून सांगितले जात आहे. या सभेचे आयोजन वाटप एमआयडीसी विरोधी संघर्ष कृती समितीने खंडाळा पंचक्रोशी सामाजिक संस्था आणि शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्या सहकार्याने आयोजित केली आहे. शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष ॲड. रोशन पाटील हेही उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या जन आक्रोश सभेत वाटप एमआयडीसी संदर्भात काय भूमिका ठरेल याबाबत शनिवारी चित्र स्पष्ट होणार आहे त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पोलिसांचा बंदोबस्ताची तयारी
या सभेच्या अनुषंगाने खंडाळा येथे कडक बंदोबस्त तैनात करण्याची तयारी पोलीस विभागाकडून करण्यात येत आहे.


आणखी एका प्रकल्पाला विरोध
रत्नागिरी जिल्ह्यात आलेल्या प्रकल्पांपेक्षा जिल्ह्यातून बाहेर घालवण्यात आलेल्या प्रकल्पांची संख्या अधिक आहे. आता या नव्या येऊ घातलेल्या प्रकल्पाला विरोध सुरू झाला असल्याने त्याचे भवितव्यही अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.