Monday, March 23, 2026

Latest Posts

शिवसेनेची पहिली यादी जाहीर! प्रभाग २ मधून ‘कर्तव्यतत्पर’ निमेश नायर यांना उमेदवारी; १५ नोव्हेंबरला भरणार अर्ज

रत्नागिरी  रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, शिवसेनेने आज आपली नगरसेवक पदाच्या ९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये प्रभाग क्रमांक २ मधून कर्तव्यतत्पर माजी नगरसेवक निमेश नायर यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.मागील ८ वर्षांतील भरीव विकासकामे आणि जनतेशी असलेली घट्ट नाळ याच्या जोरावर नायर यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या नावाची घोषणा होताच प्रभागातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.विकासकामांची पोचपावती

निमेश नायर यांच्या उमेदवारीकडे त्यांच्या मागील ८ वर्षांच्या कामाची पोचपावती म्हणून पाहिले जात आहे. प्रभाग क्रमांक २ मध्ये त्यांनी केलेल्या प्रचंड विकासकामांमुळे त्यांची जनमानसात एक वेगळी ओळख आहे. नायर यांनी आपल्या कार्यकाळात प्रभागातील रस्ते, गटारे, उद्याने, पिण्याचे पाणी, स्वच्छता, आणि पथदिवे (लाईट) यांसारख्या सर्वच मूलभूत सुविधांवर चोख काम केले आहे.

◼️’२४ तास उपलब्ध’ असणारा नगरसेवक

केवळ विकासकामेच नव्हे, तर प्रभागातील प्रत्येक नागरिकाशी असलेला थेट संपर्क, नम्रपणा आणि मतदारांना आपलेसे करणारा स्वभाव, हे निमेश नायर यांचे वैशिष्ट्य मानले जाते. ‘दिवसाचे २४ तास नागरिकांसाठी उपलब्ध असणारा कर्तव्यतत्पर नगरसेवक’ म्हणून त्यांची ओळख आहे.

वरिष्ठ नेत्यांकडून नावावर शिक्कामोर्तब

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या सूचनेनुसार, आमदार किरण सामंत आणि शिवसेना रत्नागिरी जिल्हा निवडणूक प्रभारी यशवंत जाधव यांनी ही उमेदवारी जाहीर केली.


१५ नोव्हेंबरला अर्ज दाखल करणार
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता निमेश नायर हे उद्या दिनांक १५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.