रत्नागिरी : गेली अनेक वर्ष प्रलंबित राहिलेल्या रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा बंदरावरील अनधिकृत बांधकामांवर मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या आदेशानंतर पाडण्यात आली. या कारवाईनंतर मंत्री नितेश राणे यांच्या अभिनंदनाचे फलक रत्नागिरी शहरात झळकले. शहरातील साळवी स्टॉप , मारुती मंदिर व अन्य काही परिसरात मंत्री नितेश राणे यांच्या अभिनंदनाचे फलक झळकले आहेत.
