रत्नागिरी : कोल्हापूर रत्नागिरी आंबा घाट चकरी वळणावर खासगी ट्रॅव्हल्स ७० फूट खोल दरीत कोसळली असून कोणतीही जीवित हानी नाही. ही घटना शुक्रवारी सकाळी पाचच्या दरम्यान घडलेली आहे. किरकोळ दुखापत झालेली आहे त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र साखरपा येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून अधिक तपास चालू आहे. अंदाजे बस मध्ये ९५ लोक होती.




