मुंबई : उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार हे सोमवारी दुपारी दोन वाजता राज्याचा वर्ष २०२५ _ २६ चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. नव्याने सत्तेवर आलेल्या महायुती सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प असून वित्तमंत्री म्हणून अजित पवार यांचा हा ११ अर्थसंकल्प असेल. विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस विजय मिळवून देण्यात सरकारने दिलेल्या मोफत योजनांचा मोलाचा वाटा आहे. सोमवारी अर्थसंकल्प सादर करताना वाढता खर्च महसुली तूट वाढते कर्ज, देणी व वाढत्या प्रशासकीय खर्चावर नियंत्रण याचे आव्हान वित्तमंत्र्यांसमोर असेल.