रत्नागिरी : राजापूर – लांजा -साखरपा विधानसभेचे आमदार किरण सामंत यांनी पुन्हा एकदा दिलेला शब्द पूर्ण केला असून रत्नागिरी, राजापूर, लांजा, देवरुख या आगारात एस टी बसची कमतरता होती त्यामुळे गावागावातील लोकांना गावातून तालुक्यात येण्यासाठी अडचणी सहन कराव्या लागत होत्या. मात्र या अडचणी आता थांबणार असून आमदार किरण सामंत यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. त्यांच्या पाठपुराव्यामुळे रत्नागिरी ५, राजापूर ४, लांजा ३ एस टी बस जनतेच्या सेवेत येनार आहेत. लांजा आणि राजापूरच्या एस टी बसचे उद्या आमदार किरण सामंत यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांनी मागणी पूर्ण केल्याने आ. किरण सामंत यांनी आभार मानले आहेत. निवडणुकी पूर्वी फिरत असताना लोकांनी लालपरीच्या बाबत नाराजी व्यक्त केली होती. कारण जिकडे जायचे तिकडे एस. टी. च्या अडचणी समोर यायच्या त्यावर आमदार किरण सामंत यांनी माहिती काढली त्यामुळे या विभागात आवश्यक असणाऱ्या बसेसची कमतरता असल्याचे सांगण्यात आले. त्याप्रमाणे अधिकाऱ्यांना आणि जनतेला आमदार किरण सामंत यांनी शब्द दिला की येत्या ४/५ महिन्यात प्रत्येक आगारात बसेस आणून येथील लोकांची समस्या दूर करणार आणि दिलेला शब्द तंतोतंत पाळून निवडून आल्याच्या १००दिवसाच्या आताच आमदार किरण सामंत यांनी दिलेला शब्द पूर्ण केला.
या नव्याने आलेल्या बसेस मुळे अनेक गावातील प्रवासी वर्गाचे होणारे हाल थांबणार आहेत. आमदार किरण सामंत यांनी जनतेच्या कामाची दखल घेऊन केलेल्या कामाचे कौतुक प्रत्यके तालुक्यातून केले जात आहे.
