रत्नागिरी: रत्नागिरी शहरातील प्रभाग क्र १० मधील श्री देव भैरी मार्गावरील खालची आळी मुरलीधर मंदिर परिसरातील सुशोभीकरणाची पहाणी राजापूर लांजा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैया सामंत यांनी शुक्रवारी केली. ही पाहणी करून किरण सामंत यांनी माजी नगराध्यक्ष राहुल पंडित यांचे कौतुक केले. शहरात विविध ठिकाणी अशा प्रकारच्या गोष्टी विविध भागात व्हायला हव्यात अशा देखील सूचना राहुल पंडित यांना किरण सामंत यांनी केल्या आहेत.
उद्योग मंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी शहरात पर्यटनासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे या निधीचा शहरातील सुशोभीकरणासाठी वापर व्हावा आणि या माध्यमातून शहरात विविध ठिकाणी सुशोभीकरण करावे अशा सूचना किरण सामंत यांनी राहुल पंडित त्यांना दिल्या आहे.
शहरातील हे सुशोभीकरण बघून किरण सामंत यांनी राहुल पंडित यांचे कौतुक केले. योग्य जागेचा योग्य वापर केल्याबद्दल किरण सामंत यांनी राहुल पंडित यांचे कौतुक केले. तसेच युवा उद्योजक देवांग साळवी आणि भूषण पाटणकर या या दोघांचेही कौतुक केले. यानंतर किरण सामंत यांनी राहुल पंडित यांच्या निवासस्थानी भेट दिली तसेच यावेळी किरण सामंत यांना भेटण्यासाठी स्थानिक नागरिकांची गर्दी होती.
तसेच शुक्रवारी माघी गणेशोत्सवानिमित्त विसर्जन मिरवणूक सुद्धा जात होत्या यावेळी झाडगाव चा राजा यांच्या गणपती विसर्जन मिरवणुकीत किरण सामंत यांनी जाऊन बाप्पाचा आशीर्वाद घेतला



