Wednesday, March 25, 2026

Latest Posts

आविष्कार संशोधन स्पर्धा कार्यशाळेत सहभाग

रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर कला, वाणिज्य, विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी खेड येथील ज्ञानदीप विज्ञान आणि वाणिज्य कॉलेज येथे आयोजित मुंबई विद्यापीठाच्या २० व्या आविष्कार संशोधन स्पर्धेच्या कार्यशाळेत सहभाग घेतला. स्वराली इंदुलकर (द्वितीय वर्ष विज्ञान) व सोनिया शुक्ला (तृतीय वर्ष वाणिज्य) या विद्यार्थिनी, महाविद्यालयाच्या आविष्कार रिसर्च समितीच्या सदस्य प्रा. आसावरी मयेकर यात सहभागी झाल्या. कार्यशाळेमधून आविष्कार संशोधन स्पर्धेकरीता प्रकल्प कसा करावा, त्याची मांडणी व सादरीकरण याबद्दल मार्गदर्शन देण्यात आले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांकडून वेगवेगळे उपक्रम करून घेण्यात आले. या कार्यशाळेमधून विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त माहिती मिळाली.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.