Thursday, February 12, 2026

Latest Posts

उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्ये मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील जिल्हा दौऱ्यावर

रत्नागिरी, दि. 12 (जिमाका) : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्ये मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा पुढीलप्रमाणे आहे.
   शुक्रवार, दि. 13 फेब्रुवारी रोजी  सकाळी 7 वाजता संभाजीनगर निवासस्थान, कोल्हापूर येथून वाहनाने पावस, रत्नागिरी कडे प्रयाण. सकाळी 10 वाजता श्री स्वामी स्वरूपानंद मंदिरासमोरील श्री. विजयराव देसाई यांच्या स्वरूप सावली, पावस जि. रत्नागिरी येथे आगमन व राखीव. दुपारी 12 वाजता श्री स्वामी स्वरूपानंद मंदिरामध्ये आरती व मंदीर परिसर भेट. दुपारी 1 वाजता श्री. विजयराव देसाई यांच्या वेद बंगल्यावर आगमन व राखीव. दुपारी 3 वाजता स्वरूप सावली, पावस येथे आगमन व राखीव. सायंकाळी 5 वाजता गणेशगुळे बीच व आडिवरे येथील श्री महाकाली देवीचे दर्शनाकरीता राखीव .सांयकाळी 7 वाजता स्वरूप सावली, पावस येथे आगमन राखीव व मुक्काम.
शनिवार दि. 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता श्री स्वामींचे दर्शनाकरीता राखीव. सकाळी 9.30 वाजता श्री. विजयराव देसाई यांच्या गोळप येथील आंबा कॅनिंग फॅक्टरी ची पाहणी व आंबा बागेला भेट. सोयीनुसार  रत्नागिरी येथील भगवती मंदीर, लोकमान्य टिळक जन्मस्थान व स्वातंत्र्यवीर सावरकरांनी बांधलेले पतित पावन मंदीरास भेट. दुपारी 1 वाजता संगम हॉटेल येथे आगमन व राखीव. दुपारी 2 वाजता रत्नागिरी परिसरातील अन्य स्थळांना भेटी. सायंकाळी 7 वाजता स्वरूप सावली, पावस येथे आगमन, राखीव व मुक्काम.
रविवार दि. 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता पावस, रत्नागिरी येथून वाहनाने कोल्हापूरकडे प्रयाण.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.