रत्नागिरी:- राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.
रविवार १५ जून २०२५ रोजी सकाळी १० वाजता योजक फुड्स बैंड बेवरेजेस प्रा. लिमिटेड समूहास भेट. (स्थळ : फ्लॉट नंबर, ६७/६८, लघु उद्योग वसाहत, खालची आळी, रत्नागिरी). सकाळी ११ वाजता दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मृती दालन उभारणेबाबत बैठकीस उपस्थिती. (स्थळ: टिळक आळी, रत्नागिरी). दुपारी १२.३० वाजता महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे राज्यस्तरीय अधिवेशन २०२५ (स्थळ: द. ज. कुलकर्णी सभागृह, आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय, देवरुख). दुपारी ३.०० वाजता गुंबद ग्रामपंचायत इमारत उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : ग्रामपंचायत गुंबद, रत्नागिरी). दुपारी ३.३० वाजता वाटद येथील ग्रामस्थांच्या अडीअडचणी संदर्भात बैठक (स्थळ: श्री. बापू पाटील यांचे कार्यालयात वाटद, रत्नागिरी) सायंकाळी ५.१५ वाजता श्री. सोहेल मुकादम यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट (स्थळ: विश्वेश्वर मंदिर कमान, जिल्हा न्यायालय समोर, रत्नागिरी). सायंकाळी ५.३० वाजता नूर मच्छिमार संघटना, राजिवडा च्या मच्छिमार सोसायटीचे उद्घाटन. (स्थळ राजिवडा, रत्नागिरी). सायंकाळी ६ वाजता शिवसेना तालुका प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक (स्थळ : एम.आय.डी.सी. विश्रामगृह, रत्नागिरी). सायंकाळी ७ वाजता शिवसेना शहर प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक (सदस्य नोंदणी) (स्थळ: एम. आय.डी.सी. विश्रामगृह, रत्नागिरी) रात्री ८ वाजता श्री रत्नागिरीचा राजा गणपती उत्सव व श्री प्रतिष्ठान आयोजित दहिहंडी उत्सव पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक. (स्थळ: एम. आय. डी.सी. विश्रामगृह, रत्नागिरी) रात्री सोईनुसार रत्नागिरी येथे राखीव.
सोमवार १६ जून २०२५ सकाळी १०.३० वाजता शाळा प्रवेशोत्सव अंतर्गत शाळा भेट उपक्रम कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ: जि.प.शाळा झरेवाडी नं.१. ता.जि. रत्नागिरी). सकाळी ११.१५ वाजता एडीप व वयोश्री योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील झालेल्या तपासणी शिवीरातील पात्र लाभाध्यांसाठी साहित्य वाटप कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, कुवारबाव, रत्नागिरी). दुपारी १२ वाजता शाळा प्रवेशोत्सव अंतर्गत शाळा भेट उपक्रम कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ: दामले विद्यालय, अभ्युदयनगर, रत्नागिरी) दुपारी 1.30 वाजता राणी लक्ष्मीबाई शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (महिला), रत्नागिरी या संस्थेच्या नामांतरण फलकाच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (महिला), रत्नागिरी आय.टी. आय. रोड, नाचणे, रत्नागिरी) दुपारी २.३० वाजता प्रादेशिक मनोरुग्णालय, रत्नागिरी येथे भेट (स्थळ: प्रादेशिक मनोरुग्णालय, रत्नागिरी). दुपारी ३ वाजता शालेय शिक्षण विभागातील विविध विषयांबावत आढावा बैठक (स्थळ : कै, शामराव पेजे सभागृह, जिल्हा परिषद, रत्नागिरी).
सायंकाळी ४.३० वाजता रत्नागिरी येथून मोटारीने चिपळूण कडे प्रयाण. सायंकाळी ६ वाजता चिपळूण शहर शिवसेना आयोजित गुणवंत विद्यार्थी व शहरातील मान्यवरांचा सत्कार समारंभास उपस्थिती. (स्थळ : अतिथी हॉल, चिपळूण) रात्री सोईनुसार शासकीय विश्रामगृह, चिपळूण येथे आगमन व राखीव. मध्यरात्रौ १२.५० वाजता चिपळूण रेल्वेस्थानक येथून कोकणकन्या एक्सप्रेसने (गाडी नं. २०११२) मुंबई कडे प्रयाण



