Saturday, March 21, 2026

Latest Posts

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज  रत्नागिरी दौऱ्यावर

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, श्री. एकनाथ शिंदे, यांचा रविवार, दिनांक ०१ जून २०२५ रोजी रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा निश्चित झाला आहे. या दौऱ्यात ते विविध विकासकामांचे लोकार्पण करणार असून, एका रुग्णालयाच्या उद्घाटन सोहळ्यालाही उपस्थित राहणार आहेत.

दौऱ्याच्या कार्यक्रमानुसार, उपमुख्यमंत्री श्री. शिंदे सकाळी ९.१५ वाजता ठाणे निवासस्थानाहून मुंबई विमानतळाकडे मोटारीने प्रयाण करतील. सकाळी ९.४५ वाजता मुंबई विमानतळावर पोहोचून ते विमानाने रत्नागिरी विमानतळाकडे रवाना होतील. सकाळी १०.४५ वाजता रत्नागिरी विमानतळावर आगमन झाल्यानंतर ते मोटारीने आय.टी.आय. रत्नागिरीकडे प्रयाण करतील.
सकाळी ११.०० वाजता, जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र संचलित श्री. भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालयाच्या उद्घाटन सोहळ्याला ते उपस्थित राहणार आहेत. हा सोहळा रत्नागिरी आय. टी. आय. शेजारी, मंगळवार आठवडाबाजार समोर, नाचणे-काजरघाटी रोड, ता. रत्नागिरी येथे होणार आहे. त्यानंतर दुपारी १२.०० वाजता स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी येथे जिल्हा नियोजनातून नागरी सुविधा अंतर्गत सीएनजी घंटागाड्या लोकार्पण कार्यक्रम आणि शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप कार्यक्रम उपमुख्यमंत्रींच्या उपस्थितीत पार पडेल. या कार्यक्रमांना उद्योगमंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री, मा. श्री. उदय सामंत उपस्थित राहणार आहेत.
दुपारी १.०० वाजता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी माळनाका येथील विरंगुळा शासकीय विश्रामगृहाची दुरुस्ती व नुतनीकरण करणे या कामाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर दुपारी १.३० वाजता ते मझगांव रोड, रत्नागिरी येथील लोकमान्य टिळक कॅशलेस हॉस्पिटलला भेट देतील. दुपारी २.०० वाजता संगम हॉटेल, रत्नागिरी येथे आयोजित कोकण विभागातील पत्रकारांच्या कार्यशाळेस ते सदिच्छा भेट देणार आहेत. या सर्व कार्यक्रमांना पालकमंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत.
दुपारी २.३० वाजता उपमुख्यमंत्री मोटारीने रत्नागिरी विमानतळाकडे प्रयाण करतील आणि २.४५ वाजता विमानाने मुंबई विमानतळाकडे रवाना होतील.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.