Monday, March 23, 2026

Latest Posts

एसटीच्या रस्ता सुरक्षितता अभियानाचे उद्घाटन कर्त्या व्यक्तीच्या अपघातामुळे आर्थिक, सामाजिक प्रश्न – प्रांताधिकारी जीवन देसाई

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागाच्या रस्ता सुरक्षितता अभियानाचे आज माळनाका येथील एसटीच्या बहुउद्देशीय हॉलमध्ये प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. सुरक्षितता अभियान ३१ जानेवारीपर्यंत आयोजित केले असून यात रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी, प्रशिक्षण आदी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.या वेळी मंचावर सहायक मोटार वाहन निरीक्षक अवधूत कुंभार, श्री. मोहिते, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य शशिकांत कोतवडेकर, विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे, विभागीय वाहतूक अधिकारी प्रमोद यादव, आगार व्यवस्थापक (कनिष्ठ) बालाजी आडसुळे आदी उपस्थित होते.

दुचाकी, चारचाकींचे अपघात मोठ्या प्रमाणावर होत असतात. परंतु एसटीच्या अपघातांचे प्रमाण कमी आहे. अनेकदा वाहन नीट चालवले तर अपघात टाळणे शक्य होते. अपघात टाळण्यासाठी वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे. वाहनाचा वेग, नियम न पाळणे व मोबाईलवर बोलण्यामुळे अपघात होत असतात. एखाद्या घरातील कर्ता पुरुष अपघातात गेला तर तो सामाजिक व आर्थिक चिंतेचा विषय होतो. त्यामुळे सर्वांनीच वाहन नियमात चालवा, असे आवाहन प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी केले.

याप्रसंगी विभाग नियंत्रक प्रदेश बोरसे म्हणाले की, एसटी चालकांनी बस चालवताना मोबाईल वाहकाकडे जमा करायचा आहे. हेडफोनवर बोलताना चालक आढळल्यास काही चालकांवर निलंबनाची कारवाई देखील करण्यात आली आहे. अपघात होऊ नये याकरिता खबरदारी, समुपदेशन करण्यात येते. सर्व कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळेच प्रवाशांची सुरक्षित वाहतूक करण्यात येत आहे.

पोलिस निरीक्षक अश्वनाथ खेडेकर यांनी सांगितले की, सर्वात सुरक्षित वाहन म्हणजे लाल परी आहे. चालक, वाहक व यांत्रिक कर्मचाऱ्यांमुळे एसटीची सुरक्षित वाहतूक होत आहे. आपल्यासोबत चाळीस-पन्नास कुटुंबातील व्यक्ती प्रवास करत असल्याने जबाबदारी ओळखून एसटी चालवा. लिपीक गुलाब उके यांनी सूत्रसंचालन केले. वाहतूक निरीक्षक महेश सावंत यांनी आभार मानले.

याप्रसंगी विना अपघात सेवा देणारे चालक विनायक आत्माराम पवार, विनायक दामोदर पवार व संजय आखाडे, (प्रत्येकी २५ वर्षे), अमित लांजेकर, गुरुप्रसाद रणसे (प्रत्येकी १५ वर्षे), जास्त उत्पन्न आणल्याबद्दल वाहक आण्णासो सादळे, दादासाहेब शिंदे, आगारात उत्कृष्ट काम करणारे यांत्रिक कर्मचारी के. एस. पाध्ये, एस. एम. खरात, महेश सुवारे, सुयोग भुवड यांचा प्रमाणपत्र, पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.