रत्नागिरी : भाजपाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष व आमदार रवींद्र चव्हाण यांनी स्वनिधीतून केलेल्या आणि अनिकेत पटवर्धन यांच्या पुढाकारातून पूर्णत्वास गेलेल्या रत्नागिरी शहरानजीकच्या काजरघाटी शाळा पोमेंडी खुर्द येथे प्रवासी मार्ग निवाऱ्याचा लोकार्पण सोहळा बुधवारी संपन्न झाला. आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले.
काजरघाटी शाळा पोमेंडी खुर्द याठिकाणी प्रवासी बस थांबा शेड नसल्याने नागरिकांना आणि शाळेच्या विद्यार्थ्यांना उन्हामध्ये बसची प्रतीक्षा करत उभे राहावे लागत होते. या शेडमुळे उन्हापासून आणि पावसापासून उभे राहण्यासाठी प्रवाशांची गैरसोय दूर झाली आहे.भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हा प्रवासी निवारा उभारण्यात आला आहे. या कामाचे स्थानिक लोकांनी कौतुक केले आहे. यावेळी अतुल काळसेकर , महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे, शिल्पा मराठे, राजेंद्र फाळके, दादा दळी, दादा ढेकणे, सुनील आडिवरेकर, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि काजरघाटी परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

