रत्नागिरी : कापडगाव जिल्हा प्राथमिक शाळा क्रं. २ला श्री व सौ.वर्षा परशुराम ढेकणे भारतीय जनता पार्टी महिला जिल्हाध्यक्ष रत्नागिरी (द.) यांच्याकडून एक नवीन कलर प्रिंटर भेट म्हणून देण्यात आला. या भेटीमुळे शाळेच्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना शालेय कामे आणि इतर शैक्षणिक कार्ये अधिक सुलभ होणार आहेत. शाळेतील मुख्याध्यापिका सौ.वैशाली कांबळे मॅडम व श्री.रघुवीर शेलार यांनी या भेटीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत हा उपक्रम महत्त्वाचा ठरेल, असे सांगितले. यावेळी शाळेतील शिक्षक, विद्यार्थ्यांसोबत कापडगाव(पाली)जिल्हा प्राथमिक शाळा क्रं. २ मधील शिक्षक कर्मचारी तसेच प्रमुख मान्यवर श्री विघ्नेश कोत्रे सौ. सपना पेजे श्री नितीन पाले, श्री शांताराम पेजे सौ प्रेमिका पाडावे ऐश्वर्या शिंदे श्री रविंद्र मांडवकर श्री विष्णू पाले श्री अनिल पाडावे, श्री अंकुश शेलार सर्व ग्रामस्थांनी सर्वांनी या भेटीचे स्वागत केले आणि यामुळे शाळेतील इतर शालेय कार्ये आणि कागदी कामे जलद व प्रभावीपणे होण्याची आशा व्यक्त केली.आणि श्री व सौ ढेकणे यांचे शाळा व ग्रामस्थांच्या वतीने आभार मानले.