रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी नवानगर येथे दोन एसटी बसची समोरासमोर धडक झाली. गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. काळबादेवी नवानगर येथील वळणावर चालकांना अंदाज न आल्याने हा अपघात झाला. यातील एक बस शहरी असून ती रत्नागिरीच्या दिशेने जात होती तर दुसरी बस ग्रामीण विभागाची असून ती गणपतीपुळेच्या दिशेने जात होती. या अपघातात दोन्ही बसच्या चालकांना किरकोळ दुखापत झाली असून दोन्ही बसमधील प्रवासी सुखरूप आहेत.



