Saturday, March 21, 2026

Latest Posts

कुसुमेश्वर क्रीडा मंडळ आयोजित तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत आदर्श मिरजोळे संघ विजेता

रत्नागिरी : तालुक्यातील कोतवडे येथे कुसुमेश्वर क्रीडा मंडळाच्या वतीने माघी गणेशोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धचे विजेतेपद आदर्श मिरजोळे संघाने पटकावले. गावखडी दर्यासागर संघ उपविजेता ठरला. 

उपांत्य फेरीचा सामन्यात आदर्श संघाने नाना फाउंडेशन संघ मालगुंड यांना जबरदस्त मात दिली. आदर्श संघाचा राज पाडावे याने आपल्या चढाईच्या जोरावर झुंज देत शेवटच्या क्षणाला एका गुणाने विजय मिळवला. तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये एकाच गावातील गावखडीतील दोन संघ आमने-सामने आले. यात दर्यासागर संघाने दोस्ती संघाला मात दिली. 

अंतिम सामन्यामध्ये दर्यासागर गावखडी संघाचा पराभव करताना आदर्श संघाचा राज पाडावे याला कै. अमर पेडणेकर उत्कृष्ट चढाई पट्टूचा चषक देण्यात आला, तर यश पाडावे याने उत्कृष्ट पकड करून सामना अतिशय रंगतदार केला. त्याला उत्कृष्ट पकड म्हणून कै. केतन पेडणेकर चषक देऊन सन्मानित करण्यात आले. दर्यासागर संघाचा युवराज मुडे याला अष्टपैलू खेळाडू म्हणून कै. सचिन मयेकर चषक देण्यात आला. 

बक्षीस वितरणाच्या वेळी सडये गावातील प्रतिष्ठित व्यापारी अशोक (बंधूशेठ) कदम यांनी उपविजेता संघाला चषक देऊन गौरविण्यात आले, तर कुसुमेश्वर क्रीडा मंडळातील युवा खेळाडूंनी ही विजेत्या संघाला चषक देऊन गौरविण्यात आले.

याप्रसंगी जनार्दन पेडणेकर, कृष्णा पेडणेकर, सुहास पेडणेकर, सुधाकर पेडणेकर, राजेंद्र वारेकर, नरेश कांबळे, संजय कोलगे, सुनील कांबळे, शैलेश उर्फ बाबा मयेकर आदी मान्यवर उपस्थित होते. ही स्पर्धा कुसुमेश्वर क्रीडा मंडळातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी व महिला सदस्यांच्या सौजन्याने पार पडली. 

या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य करणारे स्वप्नील उर्फ तारक मयेकर, संजय मयेकर, विठ्ठल लांजेकर, सुनील कोलगे, सुनील लिंगायत यांचे सहकार्य लाभले.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.