Wednesday, April 30, 2025

Latest Posts

कै.ल. ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिर शाळेच्या बालवाडी विभाग प्रमुख कामिनी महाडिक आणि बालवाडी शिक्षिका  नेहा मुळ्ये यांचा सेवानिवृत्तीपर सदिच्छा समारंभ उत्साहात संपन्न

रत्नागिरी: र. ए.सोसायटीच्या कै.ल.ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिरच्या बालवाडी विभागाच्या प्रमुख मान.कामिनी महाडिकबाई आणि बालवाडी शिक्षिका मान. नेहा मुळ्येबाई  यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम नुकताच उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य आणि शाळेच्या शालेय समितीचे अध्यक्ष माननीय मनोज पाटणकर, शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सौ. राजवाडेबाई, माजी मुख्याध्यापिका माननीय सौ. भोळेबाई, शिर्के प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक श्री. लिंगायतसर, गुरुकुल प्रमुख श्री. सनगरेसर, संस्थेचे आजीव सभासद श्री. तेंडुलकर सर, शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री. ऐवळेसर, श्रीमती महाडिकबाई  आणि श्रीमती मुळ्येबाई यांचे कुटुंबीय पालक,माजी विद्यार्थी आणि हितचिंतक उपस्थित होते.
      सुरुवातीला इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकासह मान्यवरांची मिरवणूक काढण्यात आली. यानंतर कार्यक्रम प्रसंगी मुख्याध्यापिका मान.राजवाडेबाई यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. श्रीमती महाडिकबाई यांनी  सुमारे २८ वर्षे आणि श्रीमती मुळ्येबाई  सुमारे १९ वर्ष  शाळेत समर्पण वृत्तीने ज्ञानदानाचे कार्य केले आहे. या कार्यक्रमात संस्थेच्यावतीने शाल,श्रीफळ, आणि भेटवस्तू देऊन श्री. पाटणकर सर यांच्या हस्ते दोन्ही सत्कारमूर्तींचा सत्कार करण्यात आला. संस्थेच्या  कार्याध्यक्षा मान. शिल्पाताई पटवर्धन व कार्यवाह मान.सतीश शेवडे सर यांनी श्रीमती महाडिकबाई आणि श्रीमती मुळ्येबाई यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच श्री.पाटणकर सर यांनी आपल्या मनोगतातून दोन्ही सेवानिवृत्त सत्कारमूर्तींना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. शाळेच्यावतीने मुख्याध्यापिका राजवाडेबाई आणि शिक्षकांच्या हस्ते श्रीमती महाडिक बाई व श्रीमती मुळ्येबाई यांना भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.तसेच त्यांच्या कुटुंबीयांचाही भेटवस्तू देऊन शाळेच्यावतीने सत्कार करण्यात आला. पालकांनीही महाडिकबाई आणि मुळ्येबाई यांचा भेटवस्तू देवून सत्कार केला .
मुख्याध्यापिका राजवाडेबाई यांनी आपल्या मनोगतातून श्रीमती महाडिकबाई आणि श्रीमती मुळ्येबाई यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. श्रीमती महाडिकबाई यांनी बालवाडी विभागप्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. श्रीमती मुळ्येबाई यांनीही आईच्या मायेने शाळेतील मुलांचा सांभाळ केला.विद्यार्थ्यांना तन्मयतेने घडवले. अशाप्रकारे अनेक चांगल्या गोष्टींचा उल्लेख करत त्यांच्या कार्याचे कौतुक राजेवाडेबाई यांनी केले. कार्यक्रमप्रसंगी माजी मुख्याध्यापिका सौ. भोळेबाई, शिक्षक श्री.ऐवळेसर, शिक्षिका सौ. चव्हाणबाई ,सेविका सौ. पेजेबाई ,श्रीमती महाडिक बाई यांची स्नुषा सौ.रचना महाडिक, श्रीमती मुळ्येबाई यांचे बंधू  श्री. सुनील देशपांडे, पालक प्रतिनिधी सौ.कांबळे आणि सौ.दाते इत्यादी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यानंतर सत्कारमूर्तीं श्रीमती महाडिकबाई यांनी आपल्या मनोगतातून संस्थेचे पदाधिकारी, विद्यमान मुख्याध्यापिका राजवाडेबाई, माजी मुख्याध्यापिका भोळेबाई तसेच माजी विभाग प्रमुख श्री. देवळेकरसर यांचे आभार मानले. बत्तीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतील अनेक अनुभव त्यांनी याप्रसंगी सांगितले. नेहमी हसतमुख राहणाऱ्या, शाळेप्रती आत्मियता बाळगणाऱ्या, विद्यार्थी प्रिय आणि पालक प्रिय महाडिकबाईंच्या मनोगताने सर्वांची मने भारावून गेली. यानंतर श्रीमती मुळ्येबाईंनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यावेळी त्यांनी संस्थेचे माजी कार्याध्यक्ष कै. अरुप्पा जोशी यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली. अतिशय कठीण आणि बिकट परिस्थितीतून स्वतः कशी उभी राहिले, हे सांगितले. प्रथम सेविका म्हणून नोकरीत रुजू झाल्यानंतर जिद्दीने शिक्षण घेऊन त्या बालवाडी शिक्षिका झाल्या, त्यावेळी शाळेने त्यांना सर्वतोपरी सहकार्य केले हे त्यांनी नमूद केले. शांत व संयमी मुळ्येबाईंनी त्यांना सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. या सत्कार समारंभाच्या निमित्ताने शहरातील बियाणी बालक मंदिर, मालतीबाई जोशी बालक मंदिरचे प्रतिनिधी, पालक, हितचिंतक शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.या  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.नेनेबाई यांनी  आणि आभार प्रदर्शन श्रीम. लाडबाई यांनी केले.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.