रत्नागिरी : इंटरनेटमुळे जग जवळ आला आहे अशावेळी घडलेली कुठलीही घटना काही वेळातच लोकांच्या कानापर्यंत पोहोचते अशा घटनेतील नेमकेपणा व्हिडिओ आणि छायाचित्राच्या माध्यमातून वाचक दर्शकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आज प्रजासत्ताक दिनापासून कोकण न्यूज एक्सप्रेस हे युट्युब चॅनेल सुरू झाले आहे रविवारी त्याचे अनौपचारिक उद्घाटन करण्यात आले इंटरनेटमुळे सर्व काही वेगवान झाले आहे प्रसार माध्यमे ही त्याला अपवाद नाहीत कुठलीही घटना घडल्यानंतर ती जास्तीत जास्त लवकर दर्शकांना खरेपणासह कळावी यावरच या चॅनलच्या माध्यमातून अधिक भर दिला जाणार आहे. कोकण न्यूज एक्स्प्रेसच्या वेबसाईटचे उद्घाटन करताना ज्येष्ठ पत्रकार मनोज मुळ्ये, नेताजी पाटील, अरुण आडिवरेकर, निलेश जगताप, मुश्ताक खान, दीपक मोहिते, अनिकेत, कृष्णा कोलापटे, कोमल कळंबटे , शुभम पवार, आणि युवा उद्योजक सौरभ मलुष्टे आदी उपस्थित होते.
