रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील आंबेशेत परिसरात गेले अनेक वर्षे असलेल्या परंपरेनुसार गावातील सर्व गणपती एकत्र मिरवणूक काढत घरी येतात. या लाला कॉम्प्लेक्स – निवखोल – आंबेशेत या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून. गणेश आगमनाची वाट रस्त्यावरील खड्ड्यांमुळे खडतर झाली आहे. त्यामुळे गणेश भक्तामध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. आंबेशेत या संपूर्ण रस्त्यावरील खड्डे गणेश आगमनापूर्वी पावसाळी डांबर वापरून तातडीने भरावे अशी मागणी भाजपचे शहर सरचिटणीस निलेश आखाडे यांनी केली आहे.
तसेच रत्नागिरी शहरातील अन्य भागातील रस्ते देखील गणपती आगमनापूर्वी पावसाळी डांबराचा वापर करून भरण्यात यावे अन्यथा गणेश भक्तांच्या रोषाला नगर पालिकेला सामोरे जावे लागेल. बाप्पांच्या आगमनापूर्वी रस्त्यांची डागडुजी व्हावी अशी मागणी भाजपाकडून करण्यात आली आहे.